soybean kapus anudan EKYC 2024 : कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी घरबसल्या मोबाईल वरून करा ई-केवायसी.!

soybean kapus anudan EKYC : आगामी निवडणूक जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारकडून नवनवीन योजना तसेच पिक विमा व सोयाबीन कापूस अनुदानाबाबत आर्थिक वितरण निर्णयाबाबत अंमलबजावणी केली जात आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय योजनेचा लाभ मिळण्याकरता शेतकऱ्यांनी आपली (soybean kapus anudan EKYC) ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपली इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून आपली (soybean kapus anudan EKYC) प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक असणार आहे. अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता देण्यात येत आहे.

मागील वर्षी म्हणजेच खरीप 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची गावनिहाय तसेच वैयक्तिक खातेदारांची यादी या पोर्टलवर देण्यात आलेली आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे या अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ही केवायसी प्रक्रिया खालील स्टेप वापरून पूर्ण करून घ्या.

soybean kapus anudan EKYC
soybean kapus anudan EKYC

सोयाबीन कापूस अनुदानासाठी घरबसल्या अशा प्रकारे करा ई- केवायसी (soybean kapus anudan EKYC)

सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 करिता ए पीक पाहणी पोर्टल द्वारे पात्र शेतकऱ्यांना 0.2 एकटा पेक्षा कमी क्षेत्राकरिता सरसकट 1000 रुपये तसेच 0.2 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राकरिता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये ही मदत जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येणार आहे. परंतु सरकारकडून यामध्ये काही अटी शिथिल करण्यात आलेले आहे. जसे की सोयाबीन कापूस अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याच्या सातबारा उतारा वरती सोयाबीन व कापूस पेरा घेतला आहे याची नोंद असायला हवी. यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक पेरा नोंदवण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली ई -पिक पाहण्याची प्रक्रिया पूर्ण नाही केली अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारकडून या योजनेचे अर्थसहाय्य लाभार्थी शेतकऱ्याच्या बँकेला आधार लिंक असलेल्या खात्यावर डीबीटीच्या अंतर्गत थेट जमा करण्यात येणार आहे.

याकरता सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपली आधार संमती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. याचपैकी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत 46.68 लाख आधार क्रमांक जोडण्यात आलेले आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता पुन्हा आपली ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.

परंतु आतापर्यंत 21.38 लाख खातेदार शेतकऱ्यांची ई-केवासी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. यापैकी 2.30 लाख खातेदारांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर त्यांची ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. याव्यतिरिक्त आता शिल्लक असलेले 19 लाख खातेदार यांच्या करता आता पोर्टलवर खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जेणेकरून पात्र शेतकरी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतील.

राज्य सरकारकडून कापूस व सोयाबीन खरीप हंगामा करता अनुदान 2024
या पिकांसाठी कापूस व सोयाबीन
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
ई केवायसी प्रक्रिया ऑनलाइन

लाभार्थी यादी कशाप्रकारे बघावी

ज्या शेतकऱ्यांना आपली इकेवाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे अशा शेतकऱ्यांची गावनिहाय यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे तुमच्या गावांमध्ये किंवा तुमचे शेत शिवारानुसार ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुमची यादी तुम्ही बघू शकता. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर या संबंधित बाबींसाठी तुम्ही कृषी सहाय्यकांसोबत संपर्क साधू शकता.

ज्या शेतकऱ्यांना कुठलीही माहिती नसेल तर ते कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून कृषी सहायकांच्या लॉगिन प्रक्रियेच्या माध्यमातून आधार संलग्न मोबाईल क्रमांकावरती ओटीपी च्या माध्यमातून तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच ज्या शेतकऱ्यांना थोडीफार अक्षर ओळख असेल अशा शेतकरी ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल वरून घरबसल्या सुद्धा आपली (soybean kapus anudan EKYC) प्रक्रिया पूर्ण करू शकता.

घरबसल्या मोबाईल वरून ई केवायसी प्रक्रिया अशाप्रकारे पूर्ण करा

कापूस अनुदान खरीप हंगाम 2023 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपली ईपीक पाहणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपली (soybean kapus anudan EKYC) ई केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करता येणार आहे. याकरता दिलेल्या खालील सोप्या स्टेप फॉलो करून तुम्ही सुद्धा इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

  • सर्वात अगोदर तुम्हाला खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट पोर्टल वरती विजिट करावी लागेल.

अधिकृत साईट ला भेट द्या

  • वेब पोर्टल ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर आता तुम्हाला दोन पर्याय बघायला मिळतील
    • Login
    • Disbursement Status
soybean kapus anudan EKYC
  • तुम्हाला दोन नंबरच्या Disbursement Status या पर्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे.
soybean kapus anudan EKYC
  • आता तुमच्यासमोर एक ऑप्शन ओपन होईल Enter Aadhaar number या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे.
  • यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल तो त्याच्या समोरील खालील रकान्यात भरून घ्यायचा आहे
  • यानंतर आता तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील
    • OTP
    • Biometric
  • तुम्हाला OTP या पर्यावर्तिक करून घ्यायचे आहे. आता तुमच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावरती ओटीपी पाठवला जाईल
  • तो ओटीपी पुढे टाकून तुम्हाला Get Data या बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमची सोयाबीन कापूस अनुदानाची (soybean kapus anudan EKYC) ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता

सोयाबीन कापूस अनुदानाची लाभार्थी यादी ऑनलाइन पहा .!

Leave a Comment