रिक्षा खरेदी करायची आहे? सरकार देणार अनुदान! 3 लक्ष 75 हजार रुपया पर्यंत अनुदान? (Riksha Anudan 2025)

Riksha Anudan 2025 : रिक्षा अनुदान योजना: राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तीच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास मंडळ मर्यादित (MSHFDC) मुंबई यांच्याद्वारे हरित ऊर्जेवर चालणाऱ्या रिक्षा दिव्यांग लोकांना घेता येणार आहे. यावर यांना अनुदानही जाहीर केले आहे (Riksha Anudan 2025) या योजनेतून पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींना 3 लक्ष 75 हजार रुपया पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाचा दिव्यांग व्यक्तींना खूपच मोठा फायदा होणार आहे हरित ऊर्जेवर चालणाऱ्या रिक्षांमुळे या रिक्षांना लागणारा इंधनाचा खर्चही खूपच कमी राहणार आहे.

या योजनेचे उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य काय आहे जाणून घेऊ Riksha Anudan 2025


दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या व्यवसायातून स्वावलंबी बनवणे या योजनेबाबतचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हरित ऊर्जेवर चालणाऱ्या रिक्षांपासून दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणार आहे.(Riksha Anudan 2025) या वाहनाचा वापर सवारी गाडी, तसेच फिरते दुकान म्हणूनही करता येऊ शकतो, ज्यामुळे व्यवसायाची विस्तार अधिक वाढू शकतो.

या योजनेसाठी असणारी पात्रता

1. अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे.
2. अर्जदार 40% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असला पाहिजे.
3. अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 55 वर्ष इतकी असली पाहिजे
4. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
5. UDID( युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन ) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

1. अलीकडील छायाचित्रे

2.स्वाक्षरी स्कॅन केलेली असलेली झेरॉक्स

3. अधिवास प्रमाणपत्र

4.जातीचा दाखला

5. रहिवासी असल्याचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, ओळखपत्र)


6.UDID प्रमाणपत्र

7. दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र 8. बँक पासबुक च्या पहिल्या पेज झेरॉक्स.

अर्ज करण्याची प्रक्रिया :

या अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. (Riksha Anudan 2025) अर्जदाराने MSHFDC या अधिकृत असलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा. अर्जाची प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पूर्ण करावी लागेल.

टप्पा 1 : या योजनेच्या काही सूचना व नियमांचे वचन


या योजनेची माहिती संपूर्ण वाचून व समजून घेणे आवश्यक आहे.(Riksha Anudan 2025)

1 यामध्ये काही गोष्टींची कमी असल्यास याची खात्री जमा करून पूर्तता करून घ्यावी.
2 लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी तपासून घ्यावी.
टप्पा 2: ऑनलाइन अर्ज बाबत माहिती
1 अर्जदाराची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरणे.
2 अर्जदाराची आर्थिक माहिती भरणे.
3 अर्जामध्ये मोबाईल नंबर संपर्क तपशील नोंदवणे.

घरकुल योजना: अर्ज करण्याची शेवटची संधी! तुमच्या हक्काचं घर मिळवा!

टप्पा 3: कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करणे

1 अर्जासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे.
2 अपलोड करतानी कागदपत्र स्वच्छ दिसली पाहिजे अशी असावी.
3 फाईलचा आकार व फॉरमॅट निर्देशानुसार असला पाहिजे
टप्पा 4: अर्जाची निश्चितीकरण पद्धत
1 आपण भरलेली माहिती पुन्हा तपासून घेणे.
2 अर्ज सबमिट केल्यानंतर पोचपावती देणे आवश्यक आहे.
3 घोषणापत्र वाचून स्वीकारणे.

अर्जासाठीच्या काही महत्त्वाच्या तारखा :

1) 22 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्यास सुरू होणार
2) 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज भरण्यात येणार आहे.

काही महत्त्वाच्या सूचना : (Riksha Anudan 2025)

अर्ज करताना जर काही समस्या आल्यास MSHFDC च्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधा.

2 अपूर्ण असलेली माहिती किंवा चुकीचे भरलेले अर्ज असले असे अर्ज नाकारले जाऊ शकतात.
3. एक वेळेस सादर केलेल्या अर्जात बदल करता येणार नाही
4 हा अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने सादर करता येईल

योजनेचे काही फायदे : (Riksha Anudan 2025)

1 पर्यावरण पूरक व्यवसाय
2 स्वयंरोजगाराची संधी
3 आर्थिक स्वावलंबन
4 कमी खर्चात व्यवसाय सुरू करता येऊ शकतो
5 शाश्वत उत्पन्नाचे साधन होऊ शकते.
नियोजना दिव्यांग व्यक्ती साठी फायद्याची ठरणार आहे. या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे त्यांना स्वावलंबी बनण्याची मोठी संधी आहे. त्यांच्या पर्यावरण पूरक वाहनामुळे प्रदूषण कमी करण्यासही खूपच मोठी मदत होणार आहे

मोठी बातमी! बांधकाम कामगारांसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज, GR जाहीर!

Leave a Comment