monsoon update : 9 ते 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील या भागात तुफान पाऊस; सविस्तर माहिती जाणून घ्या

monsoon update : अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते तसेच आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक वेळेस परतीच्या पावसाने चांगलीच धावपळ सुरू केली आहे 9 ते 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील या भागामध्ये धमाकेदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया.

आज दिनांक 9 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 13 ऑक्टोबर पर्यंत पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर तुरडक ठिकाणी विजांच्या गळगटासह किरकोळ ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये विशेषतः बुधवार व गुरुवार दिनांक 9 ते 10 ऑक्टोबर रोजी दोन दिवस संपूर्ण विदर्भामधील 11 जिल्ह्यांमध्ये तसेच गुरुवार शुक्रवार दिनांक 10 11 ऑक्टोबरला दोन दिवस खानदेश, नाशिक, नागपूर, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा दहा जिल्ह्यांमध्ये हा पाऊस तुरळक ठिकाणी होणार असून मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुंबई सह संपूर्ण कोकण व मराठवाड्यामधील काही क्षेत्रात तुरडक ठिकाणी वीजांच्या कडकडासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

monsoon update
monsoon update

परतीचा पाऊस सद्यस्थितीत जागेवरच (monsoon update)

गेल्या मागील चार दिवसांपासून नंदुरबार मध्ये चिडलेला परतीचा पाऊस हा येत्या दोन-तीन दिवसांमध्ये म्हणजे 10 ऑक्टोबर च्या दरम्यान कदाचित तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाटचाल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण सद्यस्थितीमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस या पिका बाबतची सोंगणीचे कामे तसेच वेचणीचे नीचे कामे जोरदार सुरू आहे त्यामुळे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याबाबत शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

या जिल्ह्यांना मोठा धोका इथे बघा

खपलीच्या पावसाचा अंदाज

येणाऱ्या 9-13 ऑक्टोबर पर्यंत (monsoon update) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ज्या पावसाचे आगमन होणार आहे या पावसाचे प्रमाण फारसे नसेल तसेच म्हणायला गेले तर हा पाऊस धूपटणी स्वरूपाचा व जमीन जाड कडक खपली यांना असू शकतो. परंतु यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये साठवून ठेवलेला शेतमाल ओला होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सद्यस्थितीमध्ये सुरू असलेला कोकण मराठवाड्यातील पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असून किरकोळ ठिकाणी बरसणार आहे.

पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज कसा असेल?

कोजागिरी पौर्णिमेपासून तर नरक चतुर्दशी पर्यंत यादरम्यान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकटासह केवळ मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी (monsoon update) ह्या अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे. परतीच्या पावसामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु येणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेतली असून होणारे नुकसान टाळता येईल.

हे पण वाचा : तुमच्या सोयाबीनला मिळणार जास्तीचा दर लवकर करा हे काम.!

नोव्हेंबर महिन्यात पाऊस कसा असेल?

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील पावसाचा दुसऱ्या आवर्तनामध्ये म्हणजेच 22 ते 26 ऑक्टोबर पाच दिवसाच्या दरम्यान पावसाची वाढलेली आहे. यावर्तन कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही टिकण्याची शक्यता ना करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसांमध्ये (monsoon update) पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. हा पाऊस ऑक्टोबर पासून तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा तूरडक ठिकाणी सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते.

परतीच्या पावसामुळे शेत पिकावर परिणाम

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ शकते यामध्ये सध्या स्थितीत असलेले फ्लोरिंग मधील द्राक्ष बागांची फुलझड तसेच पोंग्या मधील बागांच्या कोमांना यापासून धोका उद्भवू शकतो. तसेच आता रब्बी हंगामा मधील नुकतीच झालेली हरभरा पेरणी किंवा उभे असलेले शेतकऱ्यांच्या कांद्याचे रोप तसेच अगाप टाकलेले किंवा जे पीक उगवणीच्या स्थितीमध्ये असेल उन्हाळा गावठी ची रोपे या सर्व रोपांना धोका उद्भवू शकतो. तसेच बरेच शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन घरी घेऊन येण्यासाठी धावपळ करत आहे. बऱ्याच भागांमध्ये सोयाबीन मळणीचे कामे सुरू आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांची सुद्धा नुकसान होऊ शकते परंतु अशा सर्व शेतकऱ्यांनी (monsoon update) हा अंदाज लक्षात घेऊन आपली कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सव्वा लाख शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये मंजूर 

सहकार्य करा : सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांची धान्य किंवा पेरणीची कामे सुरू असेल तर असे शेतकरी सावधान होतील त्यामुळे तुमच्या जवळील शेतकरी ग्रुप वर ही माहिती नक्की शेअर करा.

2 thoughts on “monsoon update : 9 ते 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील या भागात तुफान पाऊस; सविस्तर माहिती जाणून घ्या”

  1. आपण दिलेली पाऊस व हवामानात होणार्‍या बदलाबाबत तंतोतंत बातमीचा अंदाज खरा ठरला आहे. धन्यवाद…! ” किसान सुखी तर सारा जहा सुखी ” हे फारच मौलिक काम आपण हाती घेतले आहे.

    Reply

Leave a Comment