Magel Tyala Saur Krishi pump : शासनाकडून शेतकऱ्यांकरिता नवनवीन योजना राबविल्या जात आहे. यामध्येच प्रमुख योजना म्हणजे मागे त्याला सौर कृषी पंप योजना होय. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लागणार आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे आतापर्यंत शेतीच्या सिंचनाकरिता कुठल्याही प्रकारचा पारंपारिक वीजपुरवठा सुद्धा उपलब्ध नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत मोठा लाभ मिळणार आहे. कारण सरकारकडून सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी मोठा लाभ मिळणार आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांकरिता सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारकडून सन 2015 पासून सौर कृषी योजनेबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुद्धा राबवल्या जात आहे. या अगोदर राज्य सरकारकडून अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. तसेच सध्या स्थितीमध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक -ब योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आता दिनांक ६/०९/२०२४ रोजी पर्यंत 2लाख 63 हजार 156 सौर कृषी पंप बसवले जाणार आहे. या योजनेबाबतचा शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाद्वारे सौर कृषी पंप योजना जाहीर करण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी किती अनुदान मिळणार? (Magel Tyala Saur Krishi pump)
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भाग घेण्याकरता सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्या अंतर्गत सौर कृषी पंप किमतीच्या 10% रक्कम व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्या अंतर्गत सौर कृषी पंप किमतीच्या 5% एवढी रक्कम योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना भरावी लागणार आहे. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. कारण बरेच शेतकरी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मात्र त्यांच्याकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी रक्कम भरून या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.
सरकारकडून मागील त्याला सौर कृषी पंप (Magel Tyala Saur Krishi pump)
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलस्रोत उपलब्ध आहे मात्र ज्या शेतकऱ्यांकडे आतापर्यंत पारंपारिक कृषी पंपाकरीता वीस पुरवठा सद्यस्थितीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला नाही. अशा प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. महावितरणाकडे या सर्व शेतकऱ्यांनी पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये (Magel Tyala Saur Krishi pump) सौर कृषी पंप बसवण्याकरता तसेच तो सौर कृषी पंप पूर्ण कार्यक्षमतेने चालवण्याकरता ज्या ठिकाणी सूर्याची किरणे सोलर पॅनल वरती पडतील, तसेच सोलर पॅनल वरती सावली किंवा अडोसा पडणार नाही. किंवा सोलर पॅनल वरती धूळ किंवा घाण बसणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे.
सोलर पॅनल ला सूर्यकिरणाच्या दिशेने फिरवून आपल्या सोलर पॅनल वरती सूर्यप्रकाश पडेल अशा स्थितीमध्ये सोलर पॅनल बसवण्यात यावा तसेच त्या सोलर पॅनल चा जमिनीचा भूभाग हा एका समांतर पातळीवरती असायला हवा. त्याचबरोबर तुमच्या विहिरीजवळ किंवा शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जलस्रोताजवळ तुमच्या सोलर पॅनल ची उभारणी करावी जेणेकरून त्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे तुम्ही वेळोवेळी तुमचा सोलर पॅनल स्वच्छ करू शकाल.
सोलर पॅनल बसवत असताना आठवणीने ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जलसिंचन ची आवश्यकता असेल अशा क्षेत्रामध्ये सोलर पॅनल उभारावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतातील पिकाला पाणी सोडणे तसेच वेळोवेळी जलसाठा करणे किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा योग्य वापर करता येईल अशाप्रमाणे तुमच्या (Magel Tyala Saur Krishi pump) सोलर पॅनल ची उभारणी करावी.
सोलर पॅनल बाबत ही काळजी नक्की घ्या (Magel Tyala Saur Krishi pump)
एका वेळेस स्थापित करण्यात आलेला सौर कृषी पंप एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणे योग्य नाही. शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णया अंतर्गत दिनांक 5-3-2024 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंपाची उभारणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या सौर कृषी पंपाची विक्री करणे किंवा हस्तांतरण करण्यास बंदी करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या सूचनेचे पालन केलेले नाही अशा शेतकऱ्यांवरती महावितरण कंपनी द्वारे गुन्हा दाखल करून कारवाई केली जाऊ शकते याची सर्व शेतकरी वर्गाने नोंद घ्यावी.
सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये (Magel Tyala Saur Krishi pump)
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये स्वतंत्र व शाश्वत जलस्रोत उपलब्ध होणार आहे
- ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कुमकुवत असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. कारण या योजनेअंतर्गत केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप पूर्ण संच फसवता येणार आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांकरिता फक्त 5Songs रक्कम भरून या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे.
- शेतकऱ्यांच्या क्षेत्रानुसार त्यांना 3 ते 7.5 एचपी पंपापर्यंत सोलर पॅनल बसवता येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता लोड सीटिंग तसेच वेळोवेळी खंडित होणारा वीजपुरवठा या समस्यांपासून कायमची सुटका मिळणार आहे (Magel Tyala Saur Krishi pump)
- सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचना करता दिवसा वीज पुरवठा होण्यास मदत मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांच्या निवडीचे निकष (Magel Tyala Saur Krishi pump)
- ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकर पर्यंत शेतजमीन असेल अशा शेतकऱ्यांना 3 एच पी क्षमतेचा सौर कृषी पंप तसेच त्यापेक्षा अधिक 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 एचपी क्षमतेचा आणि पाच एकरापेक्षा अधिक शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यास 7.5 एचपी कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक अथवा सामुदायिक शेततळे किंवा विहीर बोरवेल अथवा बाराही महिने वाहत असलेली नदी / नाले अथवा इतर सिंचन पात्रे असेल असे शेतकरी सुद्धा या योजने करता पात्र ठरणार आहेत.
- शेतकऱ्यांकडे आपल्या शेताकरिता पाणी देण्यासाठी कुठलाही सिंचन स्रोत असेल तर त्याची खात्री महावितरण अंतर्गत करण्यात येईल मात्र जलसंधारण किंवा कामाच्या पाणी जलसाठ्या मधून कुठलाही शेतकरी पाणी घेत असेल किंवा पाणी जिरवण्याच्या साठ्या मधून शेतीसाठी पाणी उपसा करत असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना -1 सौर कृषी पंप योजना -2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी या योजनेकरता पात्र ठरणार आहे.
योजनेचा लाभ मिळवण्याकरता आवश्यक कागदपत्रे (Magel Tyala Saur Krishi pump)
- ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे अशा शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा सातबारा उतारा (जलस्रोताची नोंद) असणे आवश्यक असणार आहे.
- लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेतकऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित घटकातील जाती-जमातीच्या लाभार्थ्यांकरिता या कागदपत्राची प्रत असणे आवश्यक असणार आहे.
- योजने करता अर्ज सादर करत असलेला शेतकरी एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदाराचा किंवा मालकाचा ना हरकत दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांचा पाण्याचा स्रोत हा डाग घेऊन मध्ये असेल अशा शेतकऱ्यांना भूजल सर्वेक्षण विभागाच्या अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.
- याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे ग्राहकाचा मोबाईल क्रमांक अथवा ईमेल ऍड्रेस असणे आवश्यक असणार आहे.
- सदर शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेला पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीबाबतची संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक असणार आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजने करता अर्ज प्रक्रिया (Magel Tyala Saur Krishi pump)
योजनेचे नाव | मागेल त्याला सौर कृषी पंप |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
संपर्क | 1800-233-3435 /1800-212-3435 |
यांच्याद्वारे | राज्य सरकारकडून |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
मागेल त्याला सौर कृषी पंप योजने करता अर्ज करण्यासाठी सरकारकडून स्वतंत्र वेब पोर्टल जारी करण्यात आलेल्या आहे. या योजने करता अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. शासनाने आता शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याकरता सुटसुटीत व व्यवस्थित रित्या माहिती या वेब पोर्टल वरती अपडेट केलेली आहे. याकरता शेतकऱ्यांनी अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपला अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे. योजनेसाठी अर्ज करण्याकरता खालील अधिकृत वेबसाईटचा वापर करा.
ज्या शेतकऱ्याने अर्ज सादर केलेला आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ती लाभार्थी क्रमांक व इतर महत्त्वाच्या तपशील एसएमएस द्वारे कळवला जाईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यानुसार अर्जाची स्थिती सुद्धा मोबाईल क्रमांक वरती एसएमएस द्वारे कळवण्यात येईल. यात व्यतिरिक्त शेतकऱ्याने अर्ज सादर केल्यानंतर वेळोवेळी अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघता येईल.
मदतीसाठी संपर्क करा (Magel Tyala Saur Krishi pump)
एखाद्या शेतकऱ्याने अर्ज सादर केला किंवा अर्ज सादर करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यास महावितरणाच्या तालुकास्तरावरील उपविभागीय कार्यालयास संपर्क साधावा. याचबरोबर अशा शेतकऱ्यांना महावितरणाच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रात सोबत सुद्धा संपर्क साधता येईल. याकरता महावितरणाचे टोल फ्री क्रमांक 1800-233-3435 अथवा 1800-212-3435 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
निष्कर्ष : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबाबतची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेले आहे. या योजने करता असलेली पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच इतर महत्त्वाची माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली असून तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद.!
अटल सौर कृषी पंप योजना अर्थसंकल्प 2024