Ladaki Bahin Yojana : सध्या स्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा सर्व दूर सुरू आहे. यामध्ये आता बरेच नेते मंडळी वेगवेगळे आश्वासन देण्यामध्ये गुंतलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही सरकारमध्ये चांगलीच लढत रंगताना दिसून येत आहे. यामध्ये जनतेला वेगवेगळी आश्वासने देण्यात येत आहेत. परंतु सामान्य जनतेपर्यंत बऱ्याच योजनांचा लाभ मिळतच नाही. महायुतीच्या सरकारने माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात राज्यामध्ये राबवण्यास सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करून दिले जातात. अशामध्येच आता लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी बदल करून यामध्ये आणखी मानधनामध्ये वाढ करू असे सांगितले जात आहे.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार (Ladaki Bahin Yojana)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. यामध्ये अमित शहा यांनी सांगितले की जर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार निवडून आले तर पात्र महिलांना पंधराशे रुपयांनी एवजी 2100 रुपये दरमहा देण्यात येतील. कारण सध्या स्थितीमध्ये माहिती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या माजी लाडकी बहीण योजनेला राज्यामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता एन निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठमोठे आश्वासने देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे महिलांना अगोदर 1500 रुपये देण्यात येत होते आता त्यामध्ये आणखी वाढ करून 2100 रुपये महिलांना वितरित केले जातील अशा प्रकारच्या आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात येत आहे.
महालक्ष्मी योजना (Ladaki Bahin Yojana)
काँग्रेस महाविकास आघाडीतर्फे महालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आलेली असून (Ladaki Bahin Yojana) या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र मधील महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन दिले जात आहे. याचबरोबर रविवारी मलकापूर व रावेर येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली होती. या सभेदरम्यान बोलत असताना अमित शहा यांनी काँग्रेस सहभाग आघाडीवर सुद्धा निशाणा साधलेला आहे. अमित शहा म्हणाले होते की जर महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर लाडकी बहीण योजना विरोधी पक्षनेते बंद करू शकतात. मात्र तुम्हाला कुठलीही चिंता करायची आवश्यकता नाही. कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. यामुळे जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.
खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ 15 लिटर तेलाच्या डब्याची किंमत किती?
राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची सुरुवात एक जुलै 2024 पासून करण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांची उत्पन्न वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिला (Ladaki Bahin Yojana) या योजने करता पात्र ठरलेले आहे. या योजनेअंतर्गत महायुती सरकारकडून महिलांकरता दरमहा पंधराशे रुपये वितरित केले जातात.
शेतकरी वर्गांचा रोष
सध्या राज्यामध्ये महायुती व महाविकास आघाडी असे समीकरण बघायला मिळत असून शेतकरी वर्ग चांगलाच तापलेला आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई व शेतीमालाचा कमी झालेला दर येनवेळी आलेले नैसर्गिक संकटे ओढवलेली नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच हतबल झालेला आहे. नागरिकांमध्ये सरकार विषयी रोष बघायला मिळत आहे. वाढत्या महागाईच्या दरानुसार शेतमालाचे भाव खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे शेतमाल दरवाढीची मागणी केली असून सुद्धा शेतकऱ्यांना दरवेळी आश्वासने देऊन वाट बघायला लावलेली आहे.
शेतकऱ्यांचे एकच म्हणणे आहे सरकार कोणाचेही असो मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव तसेच नैसर्गिक संकटामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळायला हवी बरेच शेतकऱ्यांचे वाढते कर्ज नैसर्गिक संकटे बेरोजगारी यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. मात्र सरकार फक्त ठराविक योजना देऊन शेतकऱ्यांची मत विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. येणारे सरकार कुठलेही असो मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळाला हवा अन्यथा शेतकरी हा जगवणे खूप कठीण होईल.
मोफत फवारणी पंपाची यादी जाहीर; यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा.!
प्रत्येक वेळी (Ladaki Bahin Yojana) मोठ-मोठे आश्वासने देऊन शेतकऱ्यांना भुल तथाफा देऊन मोठी फसवणूक केली जाते एक वेळ निवडणूक झाली सत्ता स्थापन झाल्यावर फक्त वाट बघत रहा अशी अवस्था शेतकऱ्यावरती येऊन ठेपलेली आहे. बरेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये पिक विम्याची रक्कम मिळालेलीच नाही. शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या मालाला योग्य दर मिळालेलाच नाही यामुळे आता सरकारने या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारची आशा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.
निष्कर्ष : शेतकरी मित्रांनी तसेच सामान्य नागरिकांनी योग्य त्या उमेदवाराची निवड करणे आवश्यक आहे. जो आपल्या जनतेचे प्रश्न समजून घेईल आपला शेतमालाला योग्य तो भाव देईल व कठीण परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत खंबीरपणे उभा राहील. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहोचू शकेल त्यामुळे कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये व योग्य त्या उमेदवाराची निवड करावी धन्यवाद.