राज्यात खळबळ: लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल, कारण काय? (Ladaki Bahin new Rule)

Ladaki Bahin new Rule : राज्यभरामध्ये सुमारे लाडकी बहीण (Ladaki Bahin new Rule) योजनेचा लाभ घेणाऱ्या स्त्रियांची संख्या अडीच कोटी पर्यंत पोचली असून यामध्ये निकषाची पूर्तता न करणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला व बालकल्याण विभागाणे आणि निकषात न बसणाऱ्या स्त्रियांना अपात्र करण्यासाठी नवनवीन उपाय योजना चालू केले आहेत. या योजनेमध्ये भारत सरकारने खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा असा आहे.

2100 रुपयाच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर मोठी भर येत आहे यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू केलेली आहे.
यासाठी आता (Ladaki Bahin new Rule) अंगणवाडी सेविकांना सुद्धा कामाला लावले आहेत अंगणवाडी सेविकांना प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. महिलेच्या घरी जर चार चाकी गाडी असेल तर (Ladaki Bahin new Rule) ( मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ) यांच्या यादीतून हे नाव कमी करण्यात येईल.

आज पासून मंगळवार पासून तारीख( 4 फेब्रुवारी 2025 ) अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका पडताळणी करणार आहे. चार चाकी वाहन जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असलेअसे लक्षात आल्यास लगेच या योजनेतून नाव कमी करण्यात येईल.

घरोघरी जाऊन चार चाकी आहे किंवा नाही पडताळणीचे आदेश :


पुण्यामधील 21 लाख 11 हजार 991 लाडक्या बहिणींनी या योजनेचा अर्ज केले आहे. या सर्व महिलांच्या घरी चार चाकी आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाणार आहे, चार चाकी असल्यास नाव कमी करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिन डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी काल (सोमवारी तारीख 3 फेब्रुवारी ) ऑनलाइन बैठक घेऊन राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आरटीओ विभागाकडून वाहनधारकांची यादी जमा करून जिल्हाधिकारी कडे पाठवण्यात आली आहे.

काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष : (Ladaki Bahin new Rule)


1 लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 18 ते 65 च्या दरम्यान असावे
2 लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवर नसावा. किंवा प्राप्तिकर भरणारा नसावा.
3 लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे.
4 ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल त्यांना लाभ घेता येणार नाही.
5 अन्य कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही संजय गांधी निराधार योजनेसारख्या.

मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी 5 लाखांपर्यंत कर्ज, शून्य व्याजदराणे मिळणार ! GR जाहीर!

विभक्त असलेल्या महिलांना मिळणार लाभ :


योजनेच्या माहितीनुसार कुटुंबातील दीर,सासरे अथवा घरातील इतरांच्या नावावर चार चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती, यांच्यापासून वेगळी राहत असेल. अशा महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे.

करण्यात येणार कारवाई :


लाडकी बहीण योजनेमध्ये न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभ घेण्यापासून माघार घेण्याची सांगण्यात आले होते. मात्र यानंतरही लाभार्थी महिलांच्या कडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे सरकारला आढळून आल्यास अशा लाडक्या बहिणींवर सरकारकडून कडून कठोर निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिली.

5 नियम सामान्य नागरिकांना बसणार मोठा धक्का.!

Leave a Comment