Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024 : सोयाबीन कापूस अनुदानाची लाभार्थी यादी ऑनलाइन पहा .!

Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024 : शेतकरी मित्रांनो सरकारकडून सोयाबीन कापूस 2023 खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीमुळे तसेच शेतकऱ्यांना मिळालेल्या कमी भावामुळे सरकारकडून अनुदान देण्याचे जाहीर केलेले आहे. गावानुसार या पात्र शेतकऱ्यांच्या (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024) याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे तुम्ही सोयाबीन व कापूस अनुदानाची लाभार्थी यादी ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर घर बसल्या कशा प्रकारे बघू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

आंतरराष्ट्रीय तसेच अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या किमतीमधील घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता खरीप पणन हंगाम २०२३-२४ अंतर्गत सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर च्या मर्यादीमध्ये प्रति हेक्टर 5000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे.शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक खाते दिलेले आहे त्या खात्यावरती ही रक्कम थेट डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे.

सोयाबीन कापूस अनुदानाची वैशिष्ट्ये (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024)

  • मागील वर्षी झालेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच शेतकऱ्यांना मिळालेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले होते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 हेक्टर च्या मर्याद्रीमध्ये प्रतिहेक्टर 5000 रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्यांसाठी या अनुदान योजना अंतर्गत मोठा लाभ मिळणार आहे.
  • शेतकऱ्यांकरता ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघता ही मदत अल्पशी असली तरी शेतकऱ्यांना थोडाफार या अंतर्गत फायदा होणार आहे.

सोयाबीन व कापूस अनुदान लाभार्थी यादी मध्ये ऑनलाइन नाव कशाप्रकारे तपासावे

कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरता अर्थसहाय्य योजनेअंतर्गत (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024) पोर्टल व विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टल वरती पीक निहाय व तसेच गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा तुमचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे.

यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024
  • वरील वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला farmer ssearch या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे
(Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024)
  • यानंतर तुम्हाला farmer login फार्मर लॉगिन या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून Gate OTP for Aadhar verification या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरिफाय या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहेत

ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आता तुमच्यासमोर कापूस सोयाबीन अनुदानाची शेतकऱ्यांची लाभार्थी यादी दिसेल यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडून,जिल्हा,तालुका व गाव निवडून यादीत तुमचे नाव बघायला मिळणार आहे.

कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या अनुदान लाभार्थी यादी मध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे नाव, सर्वे नंबर,खाता नंबर, तसेच पिकाचे नाव क्षेत्र सुद्धा बघायला मिळणार आहे.

शेतकऱ्यांकरता कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत शासन निर्णय या अनुसार

शेतकऱ्यांकरिता सरकारकडून सोयाबीन व कापूस अनुदान (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024) वितरित केले जाणार असून खरीप हंगाम 2023 मधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरसकट 0.2 हेक्टर च्या अधिक कमी क्षेत्राकरिता सरसकट रुपये 1000 ते 0.2 ट्रॅक्टर पेक्षा अधिक क्षेत्राकरिता त्यांच्या क्षेत्रानुसार पात्र शेतकऱ्यांकरिता प्रतिहेक्टर रुपये 5000 2 हेक्टर च्या मर्यादीमध्ये राज्य सरकारकडून अशा सर्व शेतकऱ्यांकरिता अर्थसाह्य प्रदान करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024) 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीदरम्यान मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार शासनाकडून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार शेतकरी वर्गामध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे केव्हा जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

हे पण वाचा : मागेल त्याला सौर कृषी पंप ; ऑनलाईन अर्ज आशा प्रकारे करा.!

26 सप्टेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा

कापूस व सोयाबीन (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024) अनुदानाबाबतची नवीन बातमी समोर येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 26 सप्टेंबर 2024 पासून पैसे जमा करण्यात येतील असे सांगितले जात आहे. ही माहिती पत्रकारांशी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

  • सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानी अंतर्गत खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्या अंतर्गत तुम्हाला जर शासन निर्णय बघायचा असेल तर खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.
  • 2023 च्या खरीप हंगामा मधील नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासन निर्णय बघण्याकरता खालील दिलेल्या ऑप्शन वरती क्लिक करू शकता.
  • सन 2023 अंतर्गत सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता अर्थसहाय्य देण्याविषयी बाबतचा पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध झालेला रुपये 4194.68 कोटी रुपयांचा निधी यापैकी रुपये 2516.80 कोटी निधी सण 2024 25 अंतर्गत शासन निर्णय बघण्याकरता खालील ऑप्शन वर क्लिक करा
अनुदान (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi 2024)कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान
लाभार्थी यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा
2023 च्या खरीप हंगामा मधील अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यपद्धती बाबतचा शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा
पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध झालेला शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment