Kapus Soybean Anudan 2024 : राज्य सरकारकडून कापूस उत्पादक खरीप हंगाम 2023 अंतर्गत शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान बघता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा निर्णय जाहीर केला होता. आता या करता सरकारकडून वितरणाचा ई शुभारंभ सुरू झालेला आहे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार या सर्वांच्या हस्ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार (Kapus Soybean Anudan 2024) हे अनुदान वितरण करण्याची सुरुवात झालेली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट डेबीटी अंतर्गत ही रक्कम जमा करण्यात येत आहे.
सोयाबीन कापूस अनुदान वितरणाला सुरुवात (Kapus Soybean Anudan 2024)
खरीप हंगाम 2023 अंतर्गत झालेले नुकसान बद्दल सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कापूस व सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये तसेच दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर पाच हजार रुपये असे अनुदान जाहीर केलेले आहे. (Kapus Soybean Anudan 2024) यामध्ये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यामध्ये एकूण रक्कम 2398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत असल्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. जर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघितले तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या 96 लाख 787 एवढी आहे.
परंतु ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व ज्या शेतकऱ्यांनी आपली पीक पेरा नोंदणी पूर्ण केलेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच 68 लाख 6 हजार 923 खात्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये नमो शेतकरी महासंघाच्या माहिती अनुसार आधार जुळणी व 70% पर्यंत नावाची पडताळणी करण्यात आलेली आहे. यानुसार संख्या 41 लाख 50 हजार 696 एवढी होत आहे. त्याचप्रमाणे आधार जोडणी ही 69 टक्क्यांपेक्षा अधिक माहितीच्या पडताळणी अनुसार झालेले ची संख्या 4 लाख 60 हजार 730 एवढी आहे .
त्याचबरोबर आधार संमती पत्र अनुसार माहिती भरलेल्या खात्यांची संख्या ही एकूण 17 लाख 53 हजार 130 एवढी आहे. अशा पद्धतीने आपण जर बघितले तर एकूण 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या 63 लाख 64 हजार खात्यावरती (Kapus Soybean Anudan 2024) हे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. याकरता सरकारकडून 2398 कोटी 93 लाख रुपयांची तरतूद कापूस व सोयाबीन अनुदान वाटपा करता करण्यात आलेली आहे.
तुमचे नाव यादीत अशाप्रकारे बघा (Kapus Soybean Anudan 2024)
आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे आमचे नाव यादीत आहे किंवा नाही याची आम्ही कशाप्रकारे खात्री करू शकतो. तरी याकरता शासनाद्वारे ग्रामपंचायत पातळीवरती या याद्या गावोगावी लावण्यात आलेल्या आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या (Kapus Soybean Anudan 2024) याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे. यामध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही याची जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुमचे शेत गाव शिवारामध्ये येत असेल अशा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या नावाची पडताळणी करून घ्या. तसेच याकरता सरकारकडून इ केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल केली तर खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
अनुदान वितरण | सोयाबीन कापूस खरीप हंगाम 2023 अनुदान |
लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात | डीबीटी अंतर्गत रक्कम जमा |
यादीत नाव बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
कापूस सोयाबीन अनुदानाची वैशिष्ट्ये
- राज्य सरकारकडून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व नैसर्गिक संकटे यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी सामना करावा लागतो. मात्र सरकारकडून दिलेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी हातभार लागणार आहे.
- शेतकऱ्यांचे आर्थिक तसेच मानसिक मनोबल ढासळू नये याकरता या अनुदानाची वाटप सरकारकडून केली जात आहे.
- खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते ते नुकसान भरून काढण्याचा तसेच शेतकऱ्यांना आर्थिक पाठवड देण्याचे सरकारचे वैशिष्ट्य आहे.
- शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी या अनुदानाच्या रकमेमधून मोठी मदत मिळणार आहे.
हे पण वाचा : कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी घरबसल्या मोबाईल वरून करा ई-केवायसी.!
निष्कर्ष : वरील दिलेल्या माहितीनुसार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2023 करता सरकारकडून आर्थिक सहाय्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याकरता ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पिक पाहणीची नोंद पूर्ण केलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्याने आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे तुमची ई केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. धन्यवाद.!