bandhkam kamgar yojana 2024 : सामान्य नागरिकांना (bandhkam kamgar yojana 2024) बांधकाम कामगार योजनेचा लाभ व बांधकाम कल्याणकारी योजना याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशाप्रकारे केली जाईल याविषयीची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे सविस्तर माहिती शेवटपर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा.
बांधकाम तसेच इतर बांधकाम कामगार वर्ग हे सर्व मोठ्या असंघटित वर्गामध्ये येत असतात. या योजनेच्या अंतर्गत कामगाराच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशाने त्याचप्रमाणे सुरक्षा व आरोग्य कल्याणकारी साठीच्या उपाययोजना करण्याच्या हेतूने, भारत सरकारच्या माध्यमातून इमारत तसेच इतर (bandhkam kamgar yojana 2024) बांधकाम कामगारांकरिता 1996 कायद्याच्या अंतर्गत तरतूद करण्यात आलेली आहे. रोजगार व सेवा शर्ती नियमन कायदा 1996 अंतर्गत सरकार द्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी 2007 देखील मंजूर करण्यात आलेले आहे.
या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे (bandhkam kamgar yojana 2024) महाराष्ट्र बांधकाम तसेच इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवाशर्ती नियमन कायद्याच्या अंतर्गत पारित करण्यात आलेला आहे.या अधिसूचनेच्या अनुसार सुरुवातीपासून महाराष्ट्रामध्ये इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना 5 शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्याकरता अधिनियम 2011 2015 ते 2018 या अनुसार या मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यामध्ये त्रिपक्षीय मंडळ सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये शासनामार्फत शासन मालक व कामगार यांचे प्रतिनिधी मंडळामध्ये घेण्यात आलेले आहे. नियम 135 एक याच्या माध्यमातून मंडळाचा कालावधी हा तीन वर्षाचा असणार आहे. या मंडळाचे मुख्य उद्दिष्ट हे विविध योजनांच्या माध्यमातून (bandhkam kamgar yojana 2024) इमारत तसेच इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा व आरोग्य प्रधान व इतर कल्याणकारी योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे हा असणार आहे.
बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्टे (bandhkam kamgar yojana 2024)
- बांधकाम कामगारांचे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुलभभीकरण
- प्रत्यक्षरीत्या बांधकाम कामगारापर्यंत पोहोचणे तसेच त्यांच्या अंतर्गत संपूर्ण माहिती गोळा करून घेणे.
- बांधकाम कामगारांच्या अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीमध्ये सुटसुटीत व सुलभ पणा प्रदान करणे.
- बांधकाम कामगारांना त्यांची लाभार्थी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे.
- ज्या जागेवर बांधकाम कामगार काम करतात प्रत्यक्षरीत्या त्या जागेवर जाऊन त्यांची नोंदणी करणे यामुळे बांधकाम कामगाराच्या नोंदणीमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
- कार्यकारी क्षमते अंतर्गत कुशलता प्रदान करणे
- बांधकाम कामगारांना एकदम सोप्या पद्धतीने एकमेव नोंदणी क्रमांक प्रदान करणे.
- बांधकाम कामगाराच्या नोंदणी करता मान्यता प्राप्त अधिकाऱ्याद्वारे नोंदणीची प्रक्रिया सुलभ व सोप्या पद्धतीने ऑनलाईन पूर्ण करणे.
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना 2024 |
अधिकृत वेबसाईट ऑनलाइन नोंदणी | इथे क्लिक करा |
ऑफलाईन नोंदणी फॉर्म | क्लिक करा |
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना
- पात्र लाभार्थ्यांना पहिल्या विभाज्य वेळेस खर्चाच्या पूर्तते करता रुपये 30 हजाराची मदत
- मध्यानह भोजन योजना
- सरकारकडून प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- कामगारांना आवश्यक अवजारे खरेदी करण्याकरता रुपये 5000/
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विम्याचा लाभ
- पूर्व शिक्षण तसेच ओळख प्रशिक्षण योजना
- कामगारांना सुरक्षा संच पुरवणे
- अत्यावश्यक संच पुरवणे / उदाहरणार्थ भांड्यांचा संच
बांधकाम कामगारांसाठी शैक्षणिक योजना
- या योजनेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरता प्रतिवर्षी रु 2500/-
- तसेच इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरता प्रतिवर्षी रुपये 5000 /-
- इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता प्रतिवर्षी रुपये 10,000/
- पदवीधर विद्यार्थ्यांकरता प्रतिवर्षी 20,000/
- वैद्यकीय पदवी विद्यार्थ्यांकरता रुपये 1,00,000/-
- अभियांत्रिकी पदवी विद्यार्थ्यांकरता रुपये 60,000/-
- पदविकेमध्ये प्रतिवर्षी रुपये 20,000/-
- पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी रुपये 25000 /-
- MSCIT शिक्षणाच्या शुल्का करता प्रतिपूर्ती
बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक योजना
- नैसर्गिक प्रसूती करता रुपये 15000 /-
- शस्त्रक्रियेद्वारे झालेल्या प्रसूतीसाठी रुपये 20000 /-
- गंभीर आजाराच्या उपचाराकरता रुपये 1,00,000/-
- या योजनेचा लाभ घेत असताना एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास जन्मलेल्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00000 रुपये मुदत ठेव
- अचानक कायमचे अपंगत्व आल्यास रुपये 2,00,000/-
- महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत जन आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी करण्याचा लाभ (bandhkam kamgar yojana 2024)
बांधकाम कामगारांसाठी आर्थिक योजना
- जर बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये 5 लाख कायदेशीर वारसास मिळणार
- बांधकाम कामगार कामावर असताना नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये वारसास मिळणार
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी रुपये 2 लाख मिळणार
- जर कामगाराचा मृत्यू झाला असेल तर अंत्यविधी करता 10 हजार रुपये दिले जाणार
- कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीस अथवा श्री कामगाराच्या विदुपती करता रुपये 240000 मदत दिली जाणार
- बांधकाम कामगारांना जर घर खरेदी करायची असेल किंवा घराची बांधणी करायची असेल तर बँकेकडून घेतलेल्या गृह कर्जावरील व्याजाची रक्कम ही रुपये 6 लाख अथवा 2 लाख अनुदान मिळणार (bandhkam kamgar yojana 2024)
हे पण वाचा : ई श्रम कार्ड ऑनलाइन काढा आणि महिन्याला 2000 रुपये मिळवा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.!
बांधकाम कामगार नोंदणी करता पात्रता निकष काय आहे?
- बांधकाम कामगार नोंदणी करता 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असणे आवश्यक असणार आहे (bandhkam kamgar yojana 2024)
- मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा अधिक जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून कामावरती रुजू असायला हवे.
बांधकाम कामगार नोंदणी करता आवश्यक कागदपत्रे
- ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फॉर्म-V भरून खालील प्रमाणे दस्तावेजंसह आपला अर्ज सादर करणे अनिवार्य असणार आहे
- वयाचा दाखला
- 90 दिवस ज्या ठिकाणी काम केले त्याचा पुरावा
- रहिवासी दाखला
- ओळखीचा पुरावा
- पासपोर्ट साईज 3 फोटो
- नोंदणी फी रुपये 25/- व 5 वर्षाकरिता वार्षिक वर्गणी रुपये 60
बांधकाम कामगार नोंदणी करता ऑनलाइन प्रक्रिया
तुम्हाला सुद्धा तुमची बांधकाम कामगार नोंदणी करायची असेल तर सर्वात अगोदर खाली दिलेली अधिकृत वेबसाईट ओपन करा
- आता तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला WFC पर्याय निवडून घ्यायचे आहे. आणि त्या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून process to form या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला new BOCW registration चा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला खालील आवश्यक तपशील भरून घ्यायचा आहे.
- वैयक्तिक माहिती
- कायमस्वरूपी पत्ता
- तुमचा कौटुंबिक तपशील
- बँक खात्याचा तपशील
- नियुक्त तपशील
- तुम्ही 90 दिवस काम करत असल्याच्या दाखल्याचा पुरावा
- यानंतर तुमचा फोटो तसेच तुम्हाला वरती सांगण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर घोषणापत्रही त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून फॉर्म सेव्ह करा यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल तो नंबर घेऊन तुम्हाला तुमच्या शेजारील कामगार केंद्रामध्ये जाऊन द्यायचा आहे.
अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या तुमचे बांधकाम कामगार योजनेच्या लाभाची नोंदणी करू शकता तुम्हाला काही विचारायचे असेल तर आम्हाला कॉमेंट करून विचारू शकता.
लक्ष द्या : ज्या बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अडचणी येत असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता. याकरता तुम्हाला दिलेला कामगार नोंदणीचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म घरी बसून व्यवस्थित रित्या भरून घ्यायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे जोडून त्याला तुमच्या जवळील कामगार केंद्रामध्ये जमा करायचा आहे.
बांधकाम कामगार ऑफलाईन नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सहकार्य करा : ही माहिती प्रत्येक बांधकाम कामगारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या सहकारी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.!
Gram Sevak Sahi dath nahi
Bandhkam kamgar yojna
Job karti thi
मोबाईल नंबर किसी ऐसे व्येक्ती का है , जो आपके परिवार विवरण मोजुद नही हे. ऐसी दिकत आरही हे अब क्या करे
जेवाब जरूर देना
मोबाईल नंबर किसी ऐसे व्येक्ती का है , जो आपके परिवार विवरण मोजुद नही हे. ऐसी दिकत आरही हे अब क्या करे
जेवाब जरूर देना