bandhkaam Kamgar Yojana : बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी.! दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस.!

bandhkaam Kamgar Yojana : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निवडणुका जवळ आले की सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजना ची पूर्तता केली जाते. महाराष्ट्र राज्य सरकारआणि महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 5000 रुपयांचे बोनस देण्यात येणार आहे.

राज्यांमधील 54 लाख 38 हजार 885 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येणाऱ्या दिवाळी अगोदर 5000 रुपयांचे बोनस दिले जाणार आहे. (bandhkaam Kamgar Yojana) याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये नुकताच घेण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांच्या द्वारे देण्यात आलेली आहे.

bandhkaam Kamgar Yojana
bandhkaam Kamgar Yojana

शंकर पुजारी काय म्हटले? (bandhkaam Kamgar Yojana)

ज्या बांधकाम कामगारांची नोंदणीकृत नोंद आहे अशा बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी 5000 हजार रुपयांचे बोनस हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकारा अंतर्गत सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिवाळीपूर्वी सर्व (bandhkaam Kamgar Yojana) बांधकाम कामगारांना हे बोनस मिळण्याची प्रमुख मागणी 8 ऑक्टोबर 2024 ला कृती समितीच्या माध्यमातून आझाद मैदानाद्वारे बांधकाम कामगार आंदोलनाच्या माध्यमातून केलेले होते. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी या संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केलेली होती. तसेच बोनस देण्याबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राधान्य सचिवाला सुद्धा दिली होती.परंतु त्यावेळेस निर्णय करू अशा प्रकारचे आश्वासन शिष्टमंडळाद्वारे सिंगल यांना देण्यात आले होते.

या बांधकाम कामगारांना 5000 रुपये बोनस

आता महिन्यापूर्वी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याबाबतचा निर्णय करण्यात यावा, असे निवेदन सुद्धा देण्यात आलेले होते. याविषयी सुद्धा विचार करू, अशा प्रकारचे आश्वासन कामगार मंत्री खाडे यांनी त्यावेळी दिलेले होते. तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बोनस घोषित केलेले असून, मात्र याची अंमलबजावणी शासनाने केलेली नव्हती. न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत तीन वर्षांपूर्वी बांधकाम कामगारांना शासनाने बोनस बाबत निर्णय करावा अशा प्रकारचे आदेश सुद्धा दिले होते.

या कामगारांना मिळणार लाभ

मंत्रिमंडळामध्ये झालेल्या बैठकीच्या दरम्यान कल्याणकारी मंडळातील नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांना रक्कम 5000 रुपयांचे अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) यामध्ये जे जीवित आहे अशी नोंद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या 28 लाख 73 हजार 568 तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवरून नोंदणी व नूतनीकरणाकरता प्राप्त करण्यात आलेल्या 25 लाख 65 हजार सतरा अशा एकूण 54 लाख 38 हजार पाचशे पंच्याऐंशी बांधकाम कामगारांना 5000 रुपयांच्या अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे

बांधकाम कामगाराची उद्दिष्टे

  • नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 5000 रुपये अर्थसाह्य दिवाळीपूर्वी बोनस देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. नुकतीच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय पारित करण्यात आलेला आहे.या निर्णयामुळे सामान्य कामगारांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे.
  • बांधकाम कामगारांचे आर्थिक स्थैर्य सुधारावे तसेच वाढत्या महागाई मध्ये त्यांना अर्थसहाय्य प्राप्त व्हावे या उद्देशाने सरकारकडून बांधकाम कामगारांकरिता पाच हजार रुपयांचे आर्थिक बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती नियंत्रक यांच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आलेला असून दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळणार आहे.
  • ज्या बांधकाम कामगाराची नोंद पूर्ण झालेली आहे अशा बांधकाम कामगारांना हा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
  • दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांना 5000 बोनस मिळत असल्यामुळे येणारी दिवाळी गोड होणार आहे.

खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; सणाच्या तोंडावर खाद्यतेल एवढ्या रूपांनी महागले.!

निष्कर्ष : ही माहिती तुमच्या जवळील व्हाट्सअप ग्रुप वरती जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून सर्व नागरिकांना याचा लाभ मिळेल

2 thoughts on “bandhkaam Kamgar Yojana : बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी.! दिवाळीपूर्वी 5000 रुपये बोनस.!”

Leave a Comment