soybean bajar bhav : शेतकऱ्यांच्या सोयाबीन सोंगणी चे काम पूर्ण होऊन आता काढणीला सुरुवात झालेली असून नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की आपल्या सोयाबीनला योग्य भाव केव्हा मिळणार. सद्यस्थितीमध्ये जर बघितले तर यंदाचा सोयाबीनचा बाजार हा दबावामध्ये आहे. सोयाबीनला हवा तसा हमीभाव मिळताना दिसून येत नाही.
सोयाबीनचा बाजार भाव दबावत असण्याची काही प्रमुख कारणे सुद्धा आहेत. यामध्ये प्रामुख्याने बघितले तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारपेठेमध्ये (soybean bajar bhav) मंदी दिसून येत असून देशांमधून सोयाबीनची कमी झालेली निर्यात ही कारणे आता प्रमुख ठरत आहे.
सध्या स्थितीत सोयाबीनचा दर काय आहे? (soybean bajar bhav)
सध्या शेतकऱ्यांनी नवीन सोयाबीन बाजारपेठेत दाखल करायला सुरुवात केलेली असून सोयाबीनच्या बाजारपेठेत आवक वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4000 ते 4500 रुपयांपर्यंत बाजारपेठेमध्ये दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे सरकारकडून ठरवण्यात आलेला हमीभाव दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे. सरकारने ठरवलेला हमीभाव दर हा अल्प असून परंतु बाजारपेठेमध्ये मिळत असलेला दर त्यापेक्षा कमी आहे. त्याप्रमाणे बघितले तर हमीभाव दर हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. अशा प्रकारचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
यावर्षी सोयाबीनचा पेरा अधिक प्रमाणात असल्यामुळे जागतिक पातळीवरती यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जसे की अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, पराग्वे, चीन तसेच भारत व इतर देशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा सोयाबीनचा पेरा यावर्षी जास्त असल्यामुळे सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज अधिक आहे. त्यामुळे अजून भविष्यामध्ये सोयाबीन चा पुरवठा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपण बघितले तर परिणामी जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीन तसेच सोयपिंड भाव दबावामध्ये आहे. त्याचबरोबर सोयाबीनचा (soybean bajar bhav) बाजार भाव हा अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा मंदीमध्ये दिसून येत आहे. त्या ठिकाणी सोयाबीन सतात दहा डॉलर ते 10.50 डॉलरच्या प्रति बुशेलच्या दरम्यान असल्याचे दिसत आहे. तसेच सोयापेंड 320 ते 340 डॉलर प्रति टनावरती दिसून येत आहे. तसेच सध्या स्थितीमध्ये यामध्ये अल्पशी नरमाई दिसून येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील (soybean bajar bhav) अमेरिकेतील सोयाबीन बाजारामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर अर्जेंटिनामध्ये सुद्धा पेरणीला सुरुवात झालेली आहे.तसेच ला नीना ची परिस्थिती निर्माण झालेली असून ला निना नेमका कधी धडकणार? हा प्रश्न मागील चार महिन्यांमध्ये कायम भेडसावत आहे. तसेच आता पुढील दिवसांमध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबर या काळामध्ये ला नीना येण्याची संभाव्यता वर्तवली जात आहे.
ला निनाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अर्जेंटिना तसेच ब्राझील या देशांमध्ये कमी पाऊस, पावसामध्ये खंड अशा अनेक नैसर्गिक आपत्ती जनक परिस्थिती निर्माण होतात. परंतु ला निना नेमका कधी येणार? त्याची तीव्रता अधिक वाढणार का? त्याचबरोबर अर्जेंटिना व ब्राझील या देशातील सोयाबीन पिकावर त्याचा परिणाम होणार का? हे येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे. असे झाले तर पुढील येणाऱ्या काळात सोयाबीनच्या उत्पादनामध्ये वाढ होणार का घट हा अंदाज ठरवता येणार असून त्यामुळे सोयाबीनच्या बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती चढ-उतार बघायला मिळणार आहे.
सोयापेंड मागणी वरती परिणाम (soybean bajar bhav)
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सध्या सोयापेंड भाव हे दबावत आलेले आहे. ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोया पेंड चे भाव दबाव देतात तेव्हा भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा भाव कमी होतात. भारतीय बाजारपेठेमधून सोयाबीनची निर्यात सुद्धा मागच्या काही महिन्यांपासून खूप कमी होत आहे. त्याचबरोबर सोयापेंड चा उठाव सुद्धा कमी झालेला आहे. भाव कमी झालेले असून उठाव कमी होण्याला काही कारणे सुद्धा मापक ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या उलाढालेमुळे याचा थेट परिणाम सामान्य शेतकऱ्यावरती दिसून येत आहे. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च, सोयाबीन काढण्यासाठी अधिकचा खर्च आणि त्यामध्ये आणखी सोयाबीनच्या दरामध्ये झालेली सारखीच घसरण यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे.
सर्व गावांच्या घरकुल याद्या जाहीर; घरबसल्या मोबाईलवर यादीत तुमचे नाव बघा.!
सोयाबीनचे दर कमी होण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत यामध्ये DDGS चा पर्याय तसेच मक्याचा अधिक प्रमाणामध्ये वाढलेला वापर कारण मग त्यामधून इथेनॉल काढल्यानंतर जो उरलेला अवशेष तसेच चुरा शिल्लक राहतो त्याचा वापर हा पोल्ट्री तसेच पशुखाद्य या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यामुळे त्याचा दबाव सोयापेंडच्या मागणी वरती सुद्धा होत आहे.
सोयाबीनच्या दरात भाव वाढ होईल का? तज्ज्ञांचा सल्ला
आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मधील स्थिती बघता यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे देशातील स्थिती बघता (soybean bajar bhav) सोयाबीनचा भाव हा अपेक्षित पातळीवरती पोहोचवण्याची शक्यता खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना सद्यस्थितीमध्ये सोयाबीनचा दर हा सरासरी प्रतिक्विंटल चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली असून यावर्षी सोयाबीनचे उत्पादन अधिक प्रमाणात झालेले आहे त्यामुळे पुढील चार महिने बाजारामध्ये सोयाबीनची आवक जास्त प्रमाणात असणार आहे. यामुळे सोयाबीनचे भाव दबावात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुल्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा अधिक होण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारने ठरवून दिलेल्या सोयाबीनच्या हमीभाव दराने आपल्या सोयाबीनची विक्री करावी. हमीभावापेक्षा कमी भावामध्ये सोयाबीनची विक्री करू नये अशा प्रकारचा सल्ला तज्ञांनी दिलेला आहे.
तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर असे मिळवा दरमहा 5000 रुपये
निष्कर्ष : वरील दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय तसेच देशातील चालू बाजारपेठेचा आढावा घेऊन भविष्यामध्ये साहेबांच्या बाजारभावामध्ये काही वाढ होईल का? याबाबतची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नेहमीच बाजारपेठ ही लवचिक असून त्यामध्ये केव्हाही चढ-उतार होऊ शकता ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. परंतु सध्या स्थितीमध्ये (soybean bajar bhav) सोयाबीनची बाजारपेठ मंदावलेली असून सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करावी खुल्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला कमी दर मिळत आहे याची सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
सहकार्य करा : ही माहिती तुमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून भविष्यामध्ये आपण शेअर केलेला माहितीमुळे फायदा होऊ शकेल.