monsoon update today : मागील काही दिवसांपासून राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. कारण आपल्याला राज्यामध्ये अनेक भागात ऑक्टोबर हिट चा परिणाम चांगलाच जाणू लागलेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बरेच जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसून आल्या. आपण मागील पोस्टमध्ये तुम्हाला ठराविक अंदाज वर्तवलेला होता. यानुसार त्याच तारखेला राज्यातील बऱ्याच भागांमध्ये चांगलाच पाऊस बरसला त्यामुळे आता नवीन अंदाज लक्षात घेणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता येईल.
सध्या स्थितीमध्ये राज्यातील बऱ्याच भागांमध्ये कडक उन्हाचा तडाका तसेच ढग दाटून आल्याचे वातावरण निर्माण झाल्याने उकड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.(monsoon update today) राज्यातील बऱ्याच भागात रात्री काही ठिकाणी पाऊस कोसळला. तसेच आज काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ढगाळ वातावरण (monsoon update today)
परतीच्या पावसाने बरेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे. बऱ्याच भागामध्ये सोयाबीन तसेच कापूस पिकाची काढणी सुरू असल्यामुळे पावसाने पूर्णतः पिक मातीमोल झाले आहे. परतीचा पाऊस हा उत्तर भारतामधून महाराष्ट्र मध्ये सरसावलेला आहे.मात्र तो नंदुरबार अडकलेला दिसून येत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उघडा जाणवत आहे आज महाराष्ट्रातील (monsoon update today) बऱ्याच भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मध्य महाराष्ट्र मधील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.
16 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम
त्याचबरोबर आज पासून 13 ऑक्टोबर येणाऱ्या चार दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. यामध्ये खानदेश, मराठवाडा, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच एकूण 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येणारे पुढील काही दिवस पावसाचा जवळ काय नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे पूर्ण करून घ्यावी. तसेच आपल्या शेतीमालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
वीजांच्या कडकडासह शुक्रवारी शनिवारी बरसल्यास सरी
पुणे शहरामध्ये कालपासून पावसाने हजेरी लावलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन तर संध्याकाळी पावसाचे वातावरण आपल्याला दिसून येत आहे. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाचे वातावरण दिसून येत आहे. अचानक ऊन तापत असून थोडा टाईम मध्येच विजांच्या कडकटांसह शहर परिसरामध्ये सरी कोसळल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी वादळी सरी कोसळताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे आपण बघितले तर ऑक्टोबर हिट चांगल्या प्रमाणात जाणवत असून राज्यामधील कोकण मध्य महाराष्ट्र मध्ये तूरडक व मध्यम ठिकाणी वादळी वाऱ्यांचे निर्माण झाल्याचे दिसून आले तसेच विदर्भामधील बुलढाणा शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली.
हे पण वाचा : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 412 कोटींची पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम.!
या भागामध्ये येलो अलर्ट जारी
पुणे, ठाणे, रत्नागिरी, धुळे, पालघर, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, सातारा, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.