Ladki Bahin Yojana mobile gift : लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल? तुम्हाला मिळणार का जाणून घ्या सविस्तर माहिती.!

Ladki Bahin Yojana mobile gift : सध्या स्थितीमध्ये सोशल मीडिया वरती लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल वितरित होण्याच्या बातम्या सर्व दूर बघायला मिळत आहे. मग तुम्हाला सुद्धा मोफत मोबाईल मिळणार आहे का? यासाठी नेमकी काय प्रक्रिया असेल किंवा नेमके हे प्रकरण काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण समजून घेऊया त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेला 1 जुलै 2024 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला 18000 रुपये देण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता (Ladki Bahin Yojana mobile gift) नवीन बातमी मोठ्या प्रमाणात वायरल होत असून लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल मिळणार असे सांगितले जात आहे.

Ladki Bahin Yojana mobile gift
Ladki Bahin Yojana mobile gift

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत मोबाईल (Ladki Bahin Yojana mobile gift)

सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. कशामध्येच आता एक नवीन बातमी सोशल मीडिया वरती खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.ते म्हणजे लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल दिला जाणार आहे व यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जात आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये लाखो महिला आता या स्कॅमला बळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
विभाग महिला व बालकल्याण विभाग
लाभार्थी महिला 18 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

आपणा सर्वांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरी वरती तब्बल 45 हजार कोटींचा बोजा पडला आहे. आणि अशा मध्ये आणखी नवीन भेटवस्तू देणे सरकारला कदापि शक्य नाही. सध्या स्थितीमध्ये या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून मोफत मोबाईल किंवा इतर भेटवस्तू देण्याबाबतची माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा कुठल्याही स्कॅमला बळी पडू नका कारण सरकारच्या अधिकृत साइट वरती अशी कुठलीही माहिती प्रचलित करण्यात आलेली नाही.

लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल खरे की खोटे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्र सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेअंतर्गत मोफत मोबाईल अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना देण्यात आलेला नाही ज्या अंतर्गत तुम्ही फ्री मध्ये मोबाईल मिळू शकाल. महाराष्ट्र सरकारकडून याबाबतचा कुठलाही जीआर पास झालेला नाही तसेच कुठल्याही ठिकाणी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सध्या सुरू असलेल्या व्हायरल व्हिडिओ मुळे असंख्य महिलांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सर्व महिलांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारकडून (Ladki Bahin Yojana mobile gift) मोफत मोबाईल वितरणाबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही याबाबतची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.

त्यामुळे जे युट्युब वरती तसेच इतर ठिकाणी मेसेज किंवा व्हिडिओ व्हायरल होत आहे (Ladki Bahin Yojana mobile gift) अशा कुठल्याही खोट्या बातमी वरती लक्ष देऊ नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. कुठलेही एप्लीकेशन डाउनलोड करून त्यावर तुमची माहिती देऊ नका यामध्ये तुमची आर्थिक फसवणूक होण्याची संभावना सुद्धा वर्तवली गेली आहे.

लाडकी बहीण योजना मोफत मोबाईल अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिनींना महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारकडून कुठलीही सुविधा स्कीम योजना याची अंमलबजावणी झाली असेल तर ती अधिकृत साइट वरती अथवा महाराष्ट्र सरकारच्या वतीने अधिकृतपणे जाहीर केले जाते. लाडकी बहीण योजनेची अधिकृत साईट ladakibahin.maharashtra.gov.in ही लाडकी बहीण योजनेची अधिकृत साईट आहे. यावरती अशा प्रकारचे कुठलेही अपडेट देण्यात आलेले नाही. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेबाबत कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती बघू शकता.

लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमची फसवणूक होऊ नये तसेच मोफत मोबाईल अशा कुठल्याही स्कॅमला बळी पडू नये म्हणून तुम्हाला आम्ही माहिती देत आहोत. भविष्यामध्ये (Ladki Bahin Yojana mobile gift) या योजनेविषयी कुठलेही अपडेट असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती देण्यात येते. त्यामुळे कुठलेही एप्लीकेशन इन्स्टॉल करू नका किंवा कुठल्याही गैरप्रकारच्या वेबसाईट तसेच एप्लीकेशन वर आपली माहिती देऊन तुम्ही कुठल्याही स्कॅमला बळी पडू शकता त्यामुळे याबाबतची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींनो पैसे जमा झाले नाही? लवकर करा हे काम आणि मिळवा 4500 रुपये.!

यापूर्वी अंगणवाडी सेविकांना सुद्धा म्हणजेच तीन-चार वर्षांपूर्वी मोफत मोबाईल देण्याबाबत ची बातमी वायरल झाली होती.परंतु शासनाकडून या महिलांना मोफत मोबाईल देण्याबाबतचा जीआर आलेला नाही. तसेच आतापर्यंत कुठल्याही महिलांना मोफत मोबाईल मिळालेला नाही. महाराष्ट्र मधील दोन-तीन तालुक्यातील तलाठी वर्गाकरिता मोबाईल डेटा पॅक चे पैसे देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात येतो तसेच मोफत मोबाईल वाटप करणे याबाबत अधिकृत कुठलाही जीआर पास झालेला नाही. त्यामुळे अफवांपासून सावध राहा व स्वतःची तसेच इतरांची फसवणूक होऊ देऊ नका.

6 thoughts on “Ladki Bahin Yojana mobile gift : लाडक्या बहिणींना मोफत मोबाईल? तुम्हाला मिळणार का जाणून घ्या सविस्तर माहिती.!”

  1. Namrata yogesh lahire मु पो जेऊर कुंभारी ता कोपरगाव जि अहमदनगर

    Reply

Leave a Comment