Pik Vima 2024: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार 412 कोटींची पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम.!

Pik Vima 2024: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. दिवाळीपूर्वी तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम जमा केले जाणार आहे. चला तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये समजून घेऊया. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

आपल्या सर्वांनाच माहिती की यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी तसेच ढगफुटी व पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सोयाबीन, कापूस, तुर, मुंग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता खरिपाच्या पिक विमाधारक शेतकऱ्यांकरिता 25 टक्क्यांची पिक विमा अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनाही पीक विम्याची रक्कम मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Pik Vima 2024
Pik Vima 2024

शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रक्कम जमा होणार? (Pik Vima 2024)

या अनुसार अग्रीम 412.30 कोटींची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीम बाबी अंतर्गत जिल्ह्यातील जिल्ह्यामधील सर्व मंडळामधील पिक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विमा (Pik Vima 2024) रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी युनिव्हर्सल संपू जनरल इन्शुरन्स कंपनीस पिक विमा देण्यात आलेले आहे.

पिक विमा योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pik Vima 2024)
एकूण रक्कम 412 कोटी रुपये
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान भरपाई

जालना जिल्ह्याचे जीवन ते सप्टेंबर च्या दरम्यान सरासरी पर्जन्यमान हे 603.1 एवढे आहे. तसेच सन 2024-25 मध्ये 812.4 मिलिमीटर इतका पाऊस पडलेला आहे त्यामुळे सरासरीच्या तुलनेमध्ये 134.9% पाऊस जास्त झालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी 141.8 मिलिमीटर एवढा पाऊस बरसलेला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी तसेच ढगफुटी व पूर सदृश्य पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामा मधील सोयाबीन, कापूस, तुर, मुंग, उडीद तसेच स्पोटिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या काळामध्ये पिक विमा कंपनीकडे 487,834 पूर्व सूचना प्राप्त झालेले आहेत.

हे पण वाचा : तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला मिळणार दरमहा 5000 रुपये

मुसळधार पावसामुळे दोन लाख 55 हजार 519 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यामध्ये दोन लाख 82 हजार 538 शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा नुकसान झाले असल्याचे विमा कंपनी द्वारे संरक्षणात नोंद करण्यात आलेले आहे. यानुसार 412.30 कोटी रकमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनाकडे करण्यात आलेली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिलेली आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  • नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची एकूण नुकसान भरपाई पैकी 25% नुकसान भरपाई अग्रीम रक्कम (Pik Vima 2024) वितरित करण्यात येणार आहे
  • याकरता शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्याकरता मोठी मदत होणार आहे
  • नुकसानीचा अहवाल प्रशासनाद्वारे राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे

थेट खात्यात जमा होणार मदत

हवामानावर आधारित पिक विमा ची रक्कम देण्याची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता पिक विमा कंपनीस दिवाळीपूर्वी (Pik Vima 2024) एकूण विम्याच्या मदतीच्या 25 टक्के अक्रम देण्याच्या आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

पिक विम्याचे वैशिष्ट्ये

  • बऱ्याच शेतकऱ्यांचे खरीप हंगाम 2024-25 मध्ये अतिवृष्टी तसेच अवेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारकडून आता दिलासा मिळाल्यामुळे त्यांना आता आर्थिक हातभार लागणार आहे
  • शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा झाल्यामुळे रब्बी हंगामामध्ये पेरणी करता शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेती कामासाठी उपयुक्त बी बियाणे तसेच इतर गोष्टींकरता मोठी मदत होणार आहे.
  • सद्यस्थितीमध्ये सणासुदीचे दिवस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे खात्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
  • सरकारकडून पंतप्रधान एक रुपया भरून पिक विमा देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे त्याची नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
  • शेतकऱ्यांचा उत्पादन वाढीवरती होणारा अधिकचा खर्च तसेच शेतमालाला मिळत असलेला कमी दर यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक कुमकुवत बनलेला आहे. त्यामुळे या पिक विम्याची रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.

निष्कर्ष : वरील माहिती अनुसार जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा रक्कम देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.

टीप : ही माहिती अत्यंत महत्त्वाचे असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ही पोस्ट तुमच्या सहकारी मित्रांना शेअर करून शेतकऱ्यांची मदत करा.

Leave a Comment