Soybean MSP 2024: तुमच्या सोयाबीनला मिळणार जास्तीचा दर लवकर करा हे काम.!

Soybean MSP: शेतकऱ्यांना नेहमीच नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच शेती करत असताना नैसर्गिक संकटे व त्यामध्ये शेतीमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र नेहमीच बिघडलेले असते. मात्र यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सरकारकडून आर्थिक वर्ष 2024 पंचवीस अंतर्गत सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये एवढा ठरवण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एकदम कमी दरामध्ये आपली सोयाबीन विकावी नाही लागणार मात्र तुम्ही याचा लाभ कशाप्रकारे मिळू शकता याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

सरकारकडून सोयाबीन खरेदी करण्याकरता केंद्र सुरू करण्यात आलेले आहे सध्या स्थितीमध्ये हे केंद्र संख्या कमी असून येणाऱ्या काळात त्यामध्ये वाढ होणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगितले जात आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन विक्री करता वेळी सरकारच्या हमीभाव केंद्रावरती योग्य दरामध्ये ती विकल्या जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नाही तर अल्प प्रमाणात तरी मिळणार आहे.

Soybean MSP
Soybean MSP

सोयाबीनच्या हमीभावामध्ये वाढ Soybean MSP

यंदा २०२४-२५ च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. तसेच केंद्र सरकार मार्फत 2024-25 करता सोयाबीन चा हमीभाव दर 4892 रुपये एवढा घोषित केलेला आहे. मागील वर्षी हा दर 292 रुपयांपेक्षा अधिक आहे यावर्षी शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन हमीभाव केंद्रावरती प्रतिक्विंटल 4892 प्रमाणे दर मिळणार आहे. तसे बघितले तर वाढती महागाई व उत्पादनावरती होणारा अतिरिक्त खर्च या मानाने सोयाबीनचा हमीभाव दर हा खूपच कमी आहे. परंतु यापेक्षा शेतकऱ्यांना खुल्या बाजारपेठेत जर आपली सोयाबीन विकायचे असेल तर त्यांना अजून कमी दरात आपली सोयाबीन विकावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व बाजूनेच पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये सुरू असलेला 4892 रुपये दर हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचाच म्हणावा लागणार आहे.

सोयाबीन खरेदीकेंद्र शासन नाफेड व एनसीसी केंद्रमार्फत
हमीभाव दर 4892 /- रुपये
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा,आधार कार्ड व बँकेचे पासबुक
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे क्लिक करा

सोयाबीन खरेदी करता हमीभाव केंद्र सुरू

महाराष्ट्र राज्य मधील खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची केंद्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या (Soybean MSP) किमान आधारभूत किमती अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासना अंतर्गत नाफेड व एनसीसीएफ तसेच राज्यामधील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची राज्यस्तरावरती आढावा बैठक सुद्धा पार पडलेली आहे. या बैठकी अंतर्गत चर्चासत्र झालेले असून या अनुसार 2024-25 मध्ये राज्यामध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या आधारभूत दरा अनुसार नाफेड व एनसीसीएफ याच्या माध्यमातून प्रथमतः महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपूर यांच्या वतीने राज्यामध्ये सोयाबीन खरेदी करण्याकरता शेतकरी नोंदणी दिनांक 1-10-2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करणे आवश्यक

केंद्र शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या (Soybean MSP) नाफेड व एनसीसीएफच्या या दोन्ही नोडल एजन्सी मार्फत संयुक्तपणे चर्चा करण्यात आलेली असून सोयाबीन खरेदी करता राज्य अंतर्गत जिल्ह्याची विभागणी करून नाफेड व एनसीसीएफ कार्यालयाद्वारे 26 जिल्ह्यामधील एकूण 256 खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु त्यापैकी 242 खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. ज्या केंद्रांची निश्चिती करण्यात आलेली आहे असे केंद्र लवकरच सुरू करून सोयाबीन खरेदी ला आता लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

हे पण वाचा : तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला मिळणार दरमहा 5000 रुपये

याकरता सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन विक्री केंद्रावर जाऊन आधारभूत किमतीनुसार या योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळावा याकरता सरकारकडून ही योजना राबवली जात आहे. यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली सोयाबीन विक्री करण्याकरता आपल्या जिल्ह्यातील नाफेड NCCF च्या नजीकच्या (Soybean MSP) खरेदी केंद्रावर जाऊन आपला 7/12 उतारा आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना नाफेड केंद्रावरती म्हणजेच खरेदी केंद्रावरती आपली नोंद केल्यानंतर विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने एक एसएमएस प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी तसेच खरेदी केंद्रावर घेऊन यावे अशा प्रकारे सुचित केले जाईल. आतापर्यंत सुमारे 5000 पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदी करताना नोंदणी केलेली असून येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आव्हान राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहे.

निष्कर्ष : महाराष्ट्र राज्यामध्ये जे शेतकरी सोयाबीन उत्पादक असेल व त्या शेतकऱ्यांना आपली सोयाबीन विक्री करायची असेल तर सरकारकडून यावर्षी सोयाबीन साठी 4892 रुपये एवढाv हमीभाव ठरवून देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी (Soybean MSP) हमीभाव केंद्रामध्ये जाऊन आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी व ठरवण्यात आलेल्या हमीभावाअनुसार आपल्या सोयाबीनची विक्री करावी.

सहकार्य करा: ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्या जवळील जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप वर ही माहिती शेअर करा

Leave a Comment