zataka machine : सरकारकडून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करून दिली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण योजना ठरत असून या योजनांचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना होत आहे. काही शेतकऱ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचत नसल्यामुळे ते काही योजना पासून वंचित आहे तुमच्या शेती क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांपासून पिकाची नासाडी होत असेल तर आता तुम्हाला सरकारकडून सौर (zataka machine) झटका मशीन याचा मोफत लाभ देण्यात येणार आहे मात्र हा लाभ तुम्ही कशाप्रकारे मिळू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.
सौर झटका मशीन योजना
मानव तसेच वन्य जीवन संघर्ष टाळणे त्याचबरोबर जंगला लागत जे शेतकरी आपली शेती करतात अशा शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण करता यावे यासाठी आता वन विभागाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा कुंपण 75 टक्के अनुदानावरती देण्यात येत आहे. याकरता डॉक्टर शामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबवण्यात येत आहे. (zataka machine) या योजनेच्या माध्यमातून वर्षभरामध्ये सहाशे एक शेतकऱ्यांकरता (zataka machine) सौर ऊर्जा झटका मशीन व कुंपणाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्याकरता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागणार आहे.
बरेच शेतकऱ्यांची शेती ही जंगलाला लागून असल्यामुळे वन्य प्राण्यांपासून त्यांच्या शेतीची मोठ्या प्रमाणात नासाडी होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. 2008 पासून हजारो अतिक्रमणधारकांना वन हक्क पट्टे वितरित करण्यात आल्याने आता हे शेतकरी सुद्धा जंगलालगतच्या शेती कसायला सुरुवात केलेली आहे. मात्र जंगलाचा क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षांपासून वाहक बिबट अस्वल व त्याचबरोबर तीन वर्षांपासून रानटी हत्तीचे सुद्धा हल्ले वाढलेले असल्यामुळे मानव व वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष बघायला मिळत आहे.
योजनेचे नाव | सौर झटका मशीन योजना |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
शेतकरी सुद्धा जंगलातच्या शेतीमध्ये एकटे दुकट जाण्यास घाबरतात. याच परिणामी वन्य प्राण्यांकडून शेती पिकाचे मोठे नुकसान घडून येते. वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे संरक्षण व्हायला हवे याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून वन विभागा अंतर्गत डॉक्टर शामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा विस्तार करून (zataka machine) सौर ऊर्जा कुंपणाचा समावेश 16 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आलेला आहे
75 टक्के अनुदानावर सौर झटका मशीन
सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ मिळवण्याकरता प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के एवढे किंवा हजार रुपयांपैकी ची कमी असेल त्या रकमेचे थेट लाभ पात्र शेतकऱ्याच्या डीबीटी अंतर्गत बँक खात्यावरती हे अनुदान जमा केले जाईल. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित 25 टक्के किंवा जी पण अधिकची रक्कम असेल ती रक्कम त्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
प्रथम प्राधान्य कोणाला मिळणार?
वनवृत्तिनिहाय वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेती पीक नुकसानीच्या मागील तीन वर्षांमधील गावनिहाय घटनांच्या संख्येच्या आधारावरती हे प्रथम प्राधान्य देत संवेदनशील गावाची निवड केली जात असते. सदर लाभार्थ्याकडे गावातील शेतीचा 7/12, गाव नमुना 8 अथवा वन हक्क कायद्याअंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. अशा शेतकऱ्यांना (zataka machine) सौर झटका मशीन मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
हे पण वाचा : बांधकाम कामगार नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करा; आणि मिळवा अणेक लाभ.!
या योजनेसाठी कोण अपात्र असणार आहे?
ज्या व्यक्ती वरती वन गुन्हा नोंदवण्यात आलेला असेल अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवर वाटप करण्यात आलेल्या वनपट्ट्या संदर्भात वन खात्याकडून अतिक्रमणाचा गुन्हा नोंदवलेला असेल तर तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल, या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक किंवा सामूहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ मिळवून दिला जाणार आहे.
वन विभाग अंतर्गत प्रोत्साहन
जंगला लगतच्या शेती पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याकरता शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ घ्यावा तसेच या योजनेचा लाभ घेण्याकरता महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत तसेच वन विभागाकडून जंगलाच्या शेतामध्ये अगदी सकाळी जाऊ नये अशा प्रकारचा शेतकऱ्यांना सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे.
मोफत सौर झटका मशीन अर्ज कसा करावा
ज्या शेतकऱ्यांना सौर झटका मशीन अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल व आपल्या शेतासाठी सौर झटका मशीन हवे असेल अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावे लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याकरता तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अधिक माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी कुठल्याही अडचणी येत असेल तर तुम्ही तुमच्या जवळील सी सी सेंटर किंवा सेतू केंद्रामध्ये भेट देऊ शकता. अशाप्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सौर चटका मशीन अनुदानाचा लाभ मिळवू शकता
निष्कर्ष : बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगला लगतच्या असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून खूप मोठा त्रास होतो अशा शेतकऱ्यांसाठी सरकारकडून चोर झटका मशीन 75 टक्के अनुदानावर वितरित केले जात आहे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर वरील दिलेल्या माहिती अनुसार तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.