Pm Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये; या तारखेला जमा होणार, सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी भेट.!

Pm Kisan Yojana : सध्या शेतकऱ्यांना विविध योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होत आहे. सध्या स्थितीमध्ये सणासुदीचे दिवस सुरू आहे. सरकारकडून देशातील शेतकऱ्यांकरता आता सरकारकडून मोठी भेट जाहीर केली जात आहे. पाच ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (Pm Kisan Yojana) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत चे पैसे म्हणजेच 18वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये सुद्धा जमा करण्यात येणार आहे. असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहे.

5 ऑक्टोबरला 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार निधी (Pm Kisan Yojana)

आपल्या सर्वांनाच माहिती की पीएम किसान सन्मान निधी योजना ही डीबीटी योजना अंतर्गत मधील एक सर्वात महत्त्वाची योजना आहे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कंट्रोल भजन 3.25 लाख कोटी रुपयांचे हस्तांतरण करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांसाठी आता सणासुदीच्या काळामध्ये ही आनंदाची बातमीमिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर 2024 रोजी वाशिम येथून पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (Pm Kisan Yojana) हे रक्कम थेट डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येणार आहे.

यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनात आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेला आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मोदी सरकार तिसऱ्यांदा आता सत्तेवरती आलेले आहे. 18 जून 2024 रोजी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात आलेला होता. तसेच आता त्यानंतर पाच ऑक्टोबर 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यावर अठराव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळत आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत २ हजार रुपये सुद्धा जमा केले जाणार आहे त्यामुळे असे मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहे.

Pm Kisan Yojana
Pm Kisan Yojana

कोणते शेतकरी असणार पात्र? (Pm Kisan Yojana)

ज्या शेतकऱ्यांनी डीव्हीडी अंतर्गत आपले रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहे. आणि आपली इ केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे मिळून ४ हजार रुपये थेट डीबीटी अंतर्गत बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पाच ऑक्टोबर रोजी त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. कारण पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईट वरती सुद्धा नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी केवायसी असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता शेतकऱ्यांसाठी OTP बेस केवायसी प्रक्रिया करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात आलेली आहे.

योजनेचे नावपीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हस्तांतरण
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
अनुदानाची रक्कम वार्षिक 6000/- रु
अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा

तुमच्या खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही कशाप्रकारे तपासायचे?

जे शेतकरी पी एम किसान (Pm Kisan Yojana) योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम (Pm Kisan Yojana) पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यायची आहे. यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावरील स्टेज वरती क्लिक करून घ्यायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळेल तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. यानंतर आता तुम्हाला तुमचा कॅपचा कोड त्यामध्ये भरून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला Gate status वरती क्लिक करून घ्यायचे आहे. यानंतर हप्त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. त्यामुळे शेतकरी आता मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा त्यांची संपूर्ण माहिती चेक करू शकता.

पी एम किसान योजनेचे वैशिष्ट्ये

  • या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरता आर्थिक लाभ प्राप्त होणार असून शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे.
  • शेतकऱ्यांना वेळोवेळी नैसर्गिक संकटे व आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते मात्र सरकारकडून पी एम किसान योजनेचे वार्षिक 6000 रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये अशाप्रकारे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये प्राप्त करून दिले जातात.
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट डीबीटी अंतर्गत जमा केली जाते. म्हणजेच यामधून शेतकऱ्यांमध्ये एक पारदर्शकता निर्माण होत असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते.

हे पण वाचा : बांधकाम कामगार नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करा; आणि मिळवा अणेक लाभ.!

निष्कर्ष : वरील दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी पी एम किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे असे मिळून ४ हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच ज्या शेतकऱ्याने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केलेली अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

Leave a Comment