E Shram Card 2024 : ई श्रम कार्ड ऑनलाइन काढा आणि महिन्याला 2000 रुपये मिळवा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.!

E Shram Card 2024 : सामान्य नागरिकांकरता सरकारकडून काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे मात्र या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे असे नागरिक महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहतात. आज आम्ही तुम्हाला सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या महत्त्वाच्या (E Shram Card 2024) ईश्रम कार्ड योजनेबाबत माहिती देणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठा फायदा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रामधील काम करत असणाऱ्या कामगारांचा राष्ट्रीय स्तरावरती डाटाबेस तयार करण्याकरता भारत सरकार द्वारे एक नवीन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

या पोर्टल अंतर्गत नोंदणी करणाऱ्या असंघटित क्षेत्रामधील कामगारांना २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळवून देण्यात येत असतो. E Shram Card 2024 योजने करता आतापर्यंत भारतामधून 25 कोटींपेक्षा अधिक कामगारांनी (E Shram Card 2024) या पोर्टल वरती आपली नोंदणी करण्याचे भारत सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. या योजनेबाबत कामगारांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता बघायला मिळत आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ जनसामान्य कामगारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतु बऱ्याच नागरिकांना अजून सुद्धा नेमके हे (E Shram Card 2024) पोर्टल काय आहे? प्रत्यक्षरीत्या ईश्रम कार्ड कसे काढायचे? आणि याचे कामगारांना काय फायदे होणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा लेख स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की वाचा.

ई-श्रम कार्ड पोर्टल नेमके काय आहे? (E Shram Card 2024)

भारत सरकारच्या अंतर्गत जे कामगार असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात अशा प्रकारच्या कामगारांचा एक राष्ट्रीय डाटाबेस तयार करण्याकरता भारत सरकारच्या अंतर्गत (E Shram Card 2024) श्रम तसेच रोजगार मंत्रालय ई श्रम पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टल वरती जे नागरिक म्हणजेच कामगार आपली नोंदणी करतील अशा कामगारांना (E Shram Card 2024) ईश्रम कार्ड देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत देशांमधील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये काम करत असणारे असंघटित क्षेत्रामधील कामगार या योजने करता आपला अर्ज सादर करू शकता. यामध्ये बांधकाम क्षेत्रांतर्गत कामगार, स्थलांतरित कामगार / मजूर, गावोगावी फिरून काम करणारे / फेरीवाले, घर कामगार, रोजंदारीने दुसऱ्याकडे काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर तसेच इतर असंघटित कामगारांचा समावेश या योजनेमध्ये होत असतो.(E Shram Card 2024)

ई श्रम कार्ड काढण्यासाठी नियम व अटी

  • ई श्रम कार्ड (E Shram Card 2024) काढण्याकरता कामगाराचे वय हे 16 ते 59 यादरम्यान असणे गरजेचे आहे
  • या योजनेचा लाभ मिळवण्याकरता जी व्यक्ती आयकर भरत असेल किंवा EPFO ( Employee Provident Fund Organisation) अथवा ESIC (employees State Insurance Corporation) हे सदस्य सदर E Shram Card 2024 योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • जे कामगार या पोर्टल वरती नोंदणी करतील त्यांना 12 अंकाचा युनिक कोड असलेले ई श्रम कार्ड देण्यात येत असते. या नंबरला UNA (Universal account number) असे सुद्धा म्हटले जाते.

ई श्रम कार्ड घरबसल्या ऑनलाईन कसे काढायचे?

  • तुम्हाला जर तुमचे ईश्रम कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर ईश्रम (E shram) असे सर्च करून घ्यायचे आहे आता तुमच्यासमोर एक अधिकृत पोर्टल ओपन होईल.
E Shram Card 2024
E Shram Card 2024

ई श्रम कार्ड अधिकृत वेबसाईट

  • आता तुम्हाला या ठिकाणी Self Registration अशा प्रकारचे ऑप्शन शो होईल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला सलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकून घ्यायचा आहे.
  • यानंतर आता तुम्हाला EPFO आणि ESIC जे तुम्ही सदस्य नाहीत असे त्या ठिकाणी सांगायचे आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे पर्याय दिसतील तर त्या पर्यायावर ती तुम्हाला NO या ऑप्शन वरती टिक करून घ्यायचे आहे. यानंतर send OTP या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुमच्या रजिस्टर नंबर वरती तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला Enter OTP या रकान्यात टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. यानंतर ओटीपी या पर्यायावरील बरोबरची टीक तशीच राहू द्यायचे आहे आणि त्या समोरील कॅपच्या कोड भरून देण्यात आलेल्या अटी व शर्तींना मान्यता देऊन घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असलेल्या समोरील डब्यात क्लिक करून त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी सेंड करण्यात येईल तो डीपी तुम्हाला मिळाल्यानंतर खालील रकान्यात ओटीपी टाकून validate या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर तुम्हाला आधार कार्ड च्या डिटेल्स तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी सर्व माहिती दिसेल त्यानंतर ही सर्व माहिती बरोबर आहे या समोर तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे आणि यानंतर continue to other detail या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या बाबतची काही खाजगी माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे जसे की, तुमचे लग्नाचे स्टेटस तुम्ही मॅरीड आहात किंवा नाही, तुमच्या वडिलांचे नाव आणि तुमचा सामाजिक प्रवर्ग या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही जर अपंग असाल तर Yes या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे अन्यथा No या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता यानंतर तुम्हाला तुमच्या नॉमिनीच्या डिटेल भरून घ्यायचे आहे. तुम्ही जर मॅरीड असाल तर तुम्ही तुमच्या पत्नीचे नाव नॉमिनी म्हणून टाकू शकता किंवा तुमच्या परिवारातील सदस्यांची नाव सुद्धा टाकू शकता तुम्हाला एका नॉमिनी चे नाव या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये नॉमिनी चे नाव टाकल्यानंतर त्याची जन्मतारीख, लिंग तसेच तुमच्यासोबत नॉमिनी चे काय नाते आहे ते तुम्हाला टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला save and ccontinue या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो पत्ता तुम्हाला भरावा लागणार आहे, यामध्ये सुरुवातीला आपल्याला राज्य आपल्या जिल्ह्याचे नाव आणि सध्या स्थितीमध्ये राहत असलेला पत्ता या ठिकाणी व्यवस्थित रित्या भरून घ्यायचा आहे. तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर urban आणि जर ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर rural असा पर्याय निवडून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला घर क्रमांक, राज्य जिल्हा तालुका आणि पिन कोड विषयीची माहिती व्यवस्थित रित्या टाकून घ्यायची आहे. सध्या स्थितीत राहत असलेल्या पत्त्यावरती तुम्ही किती वर्षापासून राहत आहात त्या ठिकाणी सांगायचे आहे. यानंतर तुमचा पर्मनंट ऍड्रेस सेम असेल तर तो टाकून घ्यायचा आहे. यामध्ये सुद्धा शहरी भागासाठीurban ग्रामीण भागासाठी rural असा पर्याय निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पत्त्या बाबतची माहिती भरून save and continue या पर्यावर्तिक करून घ्यायचे आहे.(E Shram Card 2024)
  • यानंतरच्या पेज वरती तुम्हाला तुमच्या शैक्षणिक माहिती बाबतची माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये तुमचे शिक्षण किती झालेले आहे. हे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. सध्या स्थितीमध्ये दरमहा तुम्ही किती पैसे कमवता ती माहिती सुद्धा भरून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला save and continue या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • पुढील पर्याय मध्ये तुम्ही सध्या काय व्यवसाय करता याबाबतची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. तुम्हाला जर कुठल्या कामाचा अनुभव असेल तर त्या संदर्भातली माहिती सुद्धा या ठिकाणी भरायची आहे. याव्यतिरिक्त तुम्ही दुसरा कुठला व्यवसाय करत असाल तर त्यासंबंधीची माहिती सुद्धा secondary ooccupation या ठिकाणी भरून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला save and continue या प्रयावर ती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यासंबंधीची माहिती भरून घ्यायची आहे. यामध्ये तुमचा खाते क्रमांक टाकून कन्फर्म करून घ्यायचे आहे. त्यामध्ये पुढे खातेदाराचे नाव, बँक संदर्भातील तपशील म्हणजेच बँकेचे नाव, बँकेचा IFSC Code, शाखेचे नाव या ठिकाणी व्यवस्थित रित्या भरून घ्यायच्या आहे. यानंतर तुम्हाला Save continue या पर्यावरण क्लिक करून घ्यायचा आहे.
  • समोरील पेजवर तुम्ही आतापर्यंत भरलेली माहिती एकाच ठिकाणी दाखवण्यात येईल. ही सर्व माहिती व्यवस्थित रित्या बघून बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची आहे. शेवटी मी भरलेली माहिती खरी आहे अशा प्रकारच्या डिक्लेशन च्या समोर असलेल्या पर्यावरती टिक करून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला submit या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • यानंतर आता तुमचे इश्रम कार्ड तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला बघायला मिळेल. स्क्रीनवर दिसत असलेल्या उजवीकडील download UAN या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे. आता तुमचे ईश्रम कार्ड बनवून तुमच्यासमोर तयार असेल. आणि तुमचे इश्रम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड होईल.
  • ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर complete rregistration या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. व तुम्हाला तुमचे इ श्रम कार्ड मिळून जाईल.

हे पण वाचा : सोयाबीन कापूस अनुदानाची लाभार्थी यादी ऑनलाइन पहा .!

वरील स्टेप व्यवस्थित रित्या फॉलो करून तुम्ही घरबसल्या तुमचे ईश्रम कार्ड डाउनलोड करू शकता. इश्रम कार्ड काढण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे याची माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

ई-श्रम कार्ड काढण्याचा फायदा काय आहे

असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सामाजिक क्षेत्रांतर्गत सुरू करण्यात आलेल्या नवनवीन योजना पोहोचवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे कारण आता ईश्वरंकाळ हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यात आलेले आहे. याE Shram Card 2024 मुळे संघटित क्षेत्रामधील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांकरता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या माध्यमातून अपघात विमा संरक्षण प्रदान करण्यात येते. तुम्ही जर ईश्रम कार्ड काढलेले असेल आणि अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास सरकारकडून 2 लाख रुपये, जर तुम्हाला अंशीक म्हणजेच थोड्या काही प्रमाणामध्ये अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचा लाभ सुद्धा देण्यात येतो. बऱ्याच नागरिकांना असे वाटते की या योजनेच्या अंतर्गत दरमहा 2000 रुपये दिले जातात. मात्र त्यापेक्षा अधिक लाभ या योजनेमध्ये नागरिकांना मिळत आहे.

E Shram Card 2024
E Shram Card 2024

भविष्यामध्ये सुद्धा सर्व सामाजिक स्तरावरील सुरक्षेच्या योजनांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये इ श्रम कार्ड चा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. सध्या स्थितीमध्ये भारतात 25 लाखांपेक्षा अधिक नागरिक या कार्डचा वापर करत आहे. तुम्ही सुद्धा आतापर्यंत इ श्रम कार्ड काढलेले नसेल तर वरील दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचे कार्ड बनवू शकता. भविष्यामध्ये सरकारकडून मिळत असलेल्या नवनवीन योजनांचा सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता.

निष्कर्ष : तुम्ही तुमचे किंवा तुमच्या परिवारा मधील सदस्यांचे घरबसल्या ईश्रम कार्ड कशाप्रकारे काढू शकता व त्याचा तुम्हाला काय लाभ मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आलेली आहे. माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे हा लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा आणि आम्ही तुम्हाला शेअर केलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…धन्यवाद.!

1 thought on “E Shram Card 2024 : ई श्रम कार्ड ऑनलाइन काढा आणि महिन्याला 2000 रुपये मिळवा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.!”

Leave a Comment