magel tyala saur krishi pump 2024 : मागेल त्याला सौर कृषी पंप ; ऑनलाईन अर्ज आशा प्रकारे करा.!

magel tyala saur krishi pump : सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आता नवनवीन योजनांचा पाऊस पाडला जात आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की निवडणूक जवळ आल्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी (magel tyala saur krishi pump)अशा प्रकारच्या नवनवीन योजना घेऊन येत असते. मात्र यामध्ये महत्त्वाची व फायदेमंद ठरणारी ही (magel tyala saur krishi pump) योजना म्हणजेच मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. कारण शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवता येणार आहे. याकरता शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज सुद्धा मागवले जात आहे. तर या विषयाची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये समजून घेऊया.

सरकारकडून सुरू करण्यात आलेली मागेल त्याला सौर कृषी पंप (magel tyala saur krishi pump) योजना अशा शेतकऱ्यांकरता आहे ज्यांच्याकडे पाण्याचे विश्वसनीय जल स्रोत उपलब्ध आहेत परंतु सिंचनाकरता वीज उपलब्ध नाही. या योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सिंचनाकरता मदत करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसवून दिले जाणार आहे. या योजनेकरता ठळक वैशिष्ट्ये काय देण्यात आलेले आहे ते खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

योजनेचे नावमागेल त्याला सौर कृषी पंप (magel tyala saur krishi pump)
यांच्याद्वारे केंद्र व राज्य सरकार द्वारे
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन

सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्ट्ये (magel tyala saur krishi pump)

  • शेतकऱ्यांना भविष्यामध्ये सिंचनाचा अधिकृत विद्युत पुरवठा निर्माण व्हावा अशा प्रकारची खात्री देणारी (magel tyala saur krishi pump) स्वयंपूर्ण योजना
  • या योजनेअंतर्गत शेतकरी फक्त 10% खर्च देऊन शेतकरी सौर पॅनल चा संपूर्ण संच तसेच कृषी पंप मिळवू शकतात.
  • SC/ST शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागेल त्यामुळे या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे
  • (magel tyala saur krishi pump) या योजनेच्या माध्यमातून उर्वरित खर्च हा केंद्र तसेच राज्य सरकार द्वारे करण्यात येणार आहे
  • या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेती क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विमा सकट 5 वर्षापर्यंतच्या दुरुस्तीची हमी सुद्धा मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वीज बिल तथा वीज कपातीची काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • शेतकऱ्यांना आता दिवसा सुद्धा वीज वापरायची हमी या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी तसेच सर्व शेतकऱ्यांचा या योजनेच्या माध्यमातून खूप मोठा फायदा घडवून येणार आहे.

योजनेतील लाभार्थी निवडीचे निकष (magel tyala saur krishi pump)

या योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याला कुठला पंप व किती अनुदान देण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण समजून घेऊया.

  • सौर कृषी पंप योजना अंतर्गत 2.5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3HP (एचपी) पर्यंतचा सौर पंप देण्यात येणार आहे. तसेच 2.51 ते 5 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांकरिता 5HP (एचपी) पर्यंतचा सौर पंप देण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन ही पाच एकरांपेक्षा अधिक असेल अशा शेतकऱ्यांना 7.5HP (एचपी) चा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे ( यामध्ये शेतकरी आपल्या इच्छेनुसार शेतजमीन कमी असल्यास पात्रतेपेक्षा कमी ऊर्जा असलेल्या पंपाची देखील निवड करू शकतात)
  • या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना संधी प्राप्त होणार असून यामध्ये वैयक्तिक तथा सामुदायिक शेततळे, बोरवेल आणि नद्या किंवा नाल्या जवळील शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ मिळवू शकता.
  • परंतु योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांकडे विहीर बोरवेल अथवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांना निश्चित जागेवरती पाण्याचा विश्वसनीय स्रोत असणे आवश्यक असणार आहे. ( यामध्ये संवर्धनाकरता असलेल्या जलाशय अंतर्गत पाणी घेण्यासाठी पंप वापरला जाऊ शकत नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी )
  • ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत किंवा या अगोदर सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही जसे की अटल सौर कृषी पंप योजना -1 अथवा-2 आणि मुख्यमंत्री सौर पंप योजना असे सर्व शेतकरी या योजने करता पात्र ठरणार आहे.

कृषी पंप योजने करता आवश्यक कागदपत्रे

  • या योजनेचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांकडे शेतीचा सातबारा उतारा (7-12 जलस्रोताची नोंद असणे आवश्यक आहे) जर शेतमालक एकटा शेतजमीचा मालक नसेल तर, इतर हिस्सेदारांचा / जमिनीच्या सर्व मालकांचा ना हरकतीचा दाखला ₹200/ च्या स्टॅम्प वरती देणे बंधनकारक असणार आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट साईज फोटो
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/ जमाती लाभार्थ्यांकरिता)
  • जर शेतकऱ्यांचा पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असेल तर भूजल सर्वेक्षण विभाग अंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र देणे सुद्धा बंधनकारक असणार आहे.

लक्षात घ्या : अर्जदार शेतकऱ्यांना ही सर्व कागदपत्रे pdf फाईल स्वरूपामध्ये अपलोड करावे लागणार आहे. यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट ची साईज 500 kb पेक्षा जास्त नसावी.

ऑनलाइन अर्ज करण्याबाबतची संपूर्ण माहिती

  • तुम्हाला सुद्धा मागे त्याला सौर कृषी पंप योजने करता अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

magel tyala saur krishi pump
magel tyala saur krishi pump
  • आता या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी सुविधा या टॅब वरती क्लिक करून घ्यायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर पॉप-अप मध्ये तुम्हाला आणखी एक ऑप्शन बघायला मिळेल अर्ज करा तुम्हाला या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर अर्जाबाबतची संपूर्ण माहिती ओपन होईल यामध्ये तुम्हाला व्यवस्थित रित्या तुमची वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, सिंचनाचा जल स्रोत /सिंचनाची इतर सर्व माहिती, कृषी तपशील, अगोदर असलेल्या पंपाचा तपशील, तुम्हाला सध्या स्थितीमध्ये लागणाऱ्या पंपाचा तपशील, घोषणापत्र आणि कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करून Submit करून घ्यायचे आहे.
  • तुमचा अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर अर्जाविषयीची पोचपावती तुम्हाला मिळेल ती तुम्हाला व्यवस्थित रित्या जपून ठेवायची आहे कारण या पोस्ट पावतीच्या माध्यमातून पुढे तुम्ही तुमच्या अर्जाबाबतची स्थिती application sstatusचेक करू शकता.

अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर

जर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज संबंधित कुठल्याही अडचणी येत असेल तर अशा शेतकऱ्यांनी तालुकास्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालय सोबत संपर्क साधावा. त्याकरता महावितरणाच्या केंद्रीय ग्राहक सेवा केंद्राची ही संपर्क साधता येऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 या क्रमांकावर ती संपर्क साधून तुम्ही माहिती मिळवू शकता.

निष्कर्ष : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांकरता सौर कृषी पंप योजने करता अर्ज मागवले जात असून शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.

Leave a Comment